बेला :- पिपरा येथील कोतवाल यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, पिपरा शिवारातील नांद नदीतील पात्रातून रेतीची अवैधरित्या चोरी होत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे बेला पोलीसांनी कोतवाल, पिपरा यांचे सोबत संयुक्त रित्या कारवाई केली असता मौजा पिपरा शिवार येथे ट्रॅक्टर मुंडा क्रमांक एम एच ४० ए एम १८९४ आणि विना कमांकाची ट्रॉली रेती सह मिळून आले, पोलीस पथकाला पाहुन आरोपी पळुन गेले. पोलीसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर मुंडा क्रमांक एम एच ४० एएम १८९४ आणि विना कमांकाची ट्रॉली आणि १ ब्रास रेती असा एकुण ६,५५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद प्रकरणी आरोपी कं १) राजकुमार कामडी, २) सुधाकर खडगी, ३) नरेश सोरते आणि ४) मोहन मांडसकर सर्व रा. पिपरी यांच्या विरूध्द पोस्टे बेला येथे कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.