– वाहनासह ४० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त उपविभागिय पोलीस अधिकारी
कुही :- वृष्टी जैन, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, उमरेड या उमरेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना मौजा कुही फाटा ते नागपूर ते उमरेड जाणारा हायवे वरील पुलाजवळ टिप्पर क एम. एच.४९ बी. होड. ७८५० हे वाहन मिळून आले. वाहन संशयीत वाटल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. टिप्परचा चालक नामे रितीक चंद्रशेखर ढोणे, वय २४ वर्ष, रा. रानमांगली, ता. भिवापुर २) क्लिनर नामे अमन करमचंद्र दुपारे, वय १९ वर्ष, रा. दिघोरा वार्ड क. २, ता. भिवापुर हे मिळुन आले. मालकाचे नाव विचारले असता वाहन मालक आरोपी कं ३ मंगेश कोल्हे, रा. खरबी, नागपुर, हा असल्याबाबत माहीती पोलीसांना प्राप्त झाली. पोलीसांनी आरोपीतांना रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद वाहन १) एम. एच.४९ बी.झेड. ७८५० किंमती ४०,००,०००/- रूपये २) ०६ ब्रास रेती किंमती ३०,०००/-रूपये ३) एक मोबाईल किंमती १०,०००/- रूपये असा एकुण ४०,४०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.