देवलापार :- पहाटे देवलापार पोलीस पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्तबातमीदाराने माहीती दिली की, जबलपुर कडुन नागपुर कडे गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतुक केली जात आहे मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी जुने देवलापार पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान एक संशयीत टाटा इंट्रा वाहन क्रमांक एम.पी २८ जी ५५४४ हे मिळुन आले. नमुद वाहन चालकाने आणि त्याच्या साथीदाराने पोलीसांची नाकाबंदी पाहुन काही अंतरावर वाहन थांबवुन वाहन सोडुन पळ काढला. पोलीसांनी शिताफिने त्यांचा पाठलाग करून वाहन चालकाच्या साथीदाराला पकडले. त्याला नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद माजीद मोहम्मद साबीर शेख, वय ३४ वर्ष रा. मौलाना चौक, छोटी मजीद के पास, लष्करी बाग, नया नकासा, नागपूर असे असल्याची माहीती दिली. त्याला चालकाचे नाव विचारले असता टाटा इंट्रा वाहन क्रमांक एम.पी २८ जी ५५४४ चा चालक/मालक आरोपी उजेब रा. नागपुर हा असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाली. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ९ गोवंश जनावरे असे मिळुन आले. नमुद गोवंश जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अंत्यत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन, चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयीतेने वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले.
अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी गुन्हा; ९ जनावरांची सुटका, १ अटक
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.