spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आठवडी बाजारात पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी

– वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्यापारी कल्याणकारी संस्थेचे निवेदन

– एटीएम-ज्वेलर्स फोडीप्रकरणी पोलिसांचा सत्कार

खापा, वार्ताहर :- शहर व परिसरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करून गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी कल्याणकारी संस्था, खापा यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खापा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांना निवेदन दिले.

आठवडी बाजारात मोबाईल चोरीसह अन्य चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने बाजार परिसरात पोलिसांची उपस्थिती वाढवून चोरट्यांवर वचक निर्माण करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावर पोलीस निरीक्षक काळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बाजार परिसरातील गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले. तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.

दरम्यान, शहरातील एटीएम व ज्वेलर्स फोडीच्या प्रयत्नातील आरोपींना अवघ्या काही तासांत ताब्यात घेऊन गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल व्यापारी कल्याणकारी संस्था, खापा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ राठोड तसेच शोध पथकातील पोलिसांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक पेटकर, उपाध्यक्ष कैलास कापसे, सचिव वीरेंद्र तातेड, कोषाध्यक्ष किशोर आष्टनकर, सदस्य छगन कवडे, मकसूद शेख, गजानन पडोळे, देवेंद्र श्रोते, भूपेंद्र सोनकुसळे, नामदेव गाडीगोणे, ज्ञानेश्वर बागडे, आशिष वारोतकर, राजा पेटकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.