spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

१९ फेब्रुवारी पुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसविण्याची मागणी

– कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन

कन्हान :- नगरपरिषद कन्हान- पिपरी अंतर्गत प्रभाग क्र. आठ शिवाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक स्थळाचे सौदर्यीकरण होत आहे. बांधकाम तातडीने पुर्ण करुन १९ फेब्रुवारी २०२६ पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा बस विण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच पदाधिका ऱ्यांनी मुख्याधिकारी दिपक घोडके व नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांना निवेदन देऊन केली आहे.

कन्हान शहरातील शिवाजी नगर येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत व जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकाचे सौदर्यीकरण कामाकरिता दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा काढुन स्थळा चे बांधकाम उशीरा सुरु करण्यात आले. या बांधकामाला दिड ते दोन वर्ष होत असुन बांधकाम अत्यंत संत गतीने सुरू आहे. मध्यतंरी बराच काळ काम बंद राहिल्याने आता पर्यंत सौदर्यीकरणाचे काम पुर्ण झालेले नाही नाही. मागिल वर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सवाच्या दिवशी किल्यावर अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचां पुतळा नसल्याने शिव मावळांच्या भावना दुखावल्या होत्या. महाराष्ट्रा सह संपुर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजा विषयी नागरिकांच्या मनात मानाचे स्थान असतांना पी डब्लु डीचे अधिकारी, कन्हान- पिपरी नगरपरिषद प्रशासन, जनप्रतिनिधि, खासदार, आमदार या कडे दुर्लक्ष करुन शिव प्रेमी नागरिकांच्या भावनाशी खेळत आहे का ? अश्या तीव्र भावना नागरिक व्यक्त करित आहे.

बांधकाम संतगतीने सुरु असुन या वर्षी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव शिवाजी नगर येथे जल्लोषात साजरा होणार काय ? असा प्रश्न निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांचा नेतृत्वात मुख्याधिकारी दिपक घोडके आणि नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा करुन छत्रपती शिवाजी महा राजांचा स्मारकाचे सौदर्यीकरण बांधकाम वेगाने पुर्ण करून १९ फेब्रुवारी पुर्वी छत्रपती शिवाजी महाराजां चा अश्वरूढ पुतळा बसविण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, सुरज वरखडे, अर्जुन पात्रे, प्रमोद गिऱ्हे, माहेर इंचुलकर, मृणाल सरोजकर, यश शेंडे, रुपेश मेश्राम, महिला सदस्य सुषमा मस्के, अर्चना तांडेकर, मीना गिऱ्हे, निखिल मेश्राम, अभिषेक साखरे सह सदस्य उपस्थित होते.

अन्यथा कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी

शहरातील शिवाजी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा १६ ऑगस्ट २०२४ रोजी पुतळा काढुन स्मारक स्थळाचे बांधकाम सुरु करण्यात आले. बांध कामाला दिड ते दोन वर्ष होत असुन बांधकाम आता पर्यंत पुर्ण झालेले नाही. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव देशात साजरा होणार आहे . त्या पुर्वी शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवुन शिवप्रेमीं व मावळ्यांना उत्साहात जन्मोत्सव साजरा करु द्या, अन्यथा संबधित कंत्राटदा रावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केली .

१९ फेब्रुवारी पुर्वी शिवाजी महाराजांचा पुतळ बसणार , नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे आश्वासन

कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांना १९ फेब्रुवारी पुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसविण्याची मागणी केली असता त्यांनी बसविण्याचे आश्वासन दिले, तर संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी नगरसेवक हरिष तिडके यांचाशी प्रत्यक्ष भेटुन चर्चा केली असता त्यांनी देखिल १९ फेब्रुवारी पुर्वी बसवि ण्याचे आश्वासन दिले आहे.

निधी मुळे उशीर झाला, घाई करता येत नाही, मार्च ते एप्रिल महिण्या पर्यंत पुर्ण होईल – गोतमारे

सदर बाब कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी पीडब्लुडीचे अधिकारी गोतमारे यांना दुरध्वनी द्वारे संर्पक केला. असता गोतमारे यांनी म्हटले कि छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक स्थळाचे बांधकाम खुप बारीक असल्याचे सांगितले. प्लास्टर करायला एक महिना लागला असुन खालचे प्लास्टर बाकी आहे. ऋषभ बावनकर यांनी १९ फेब्रुवारी पुर्वी बांधकाम पुर्ण होईल काय ? असा प्रश्न विचारला असता गोतमारे यांनी तारीख देण्यास नकार दिला, पण हे बांधकाम पारशिवनी तालुक्याच्या अंतर्गत काम होणार आहे, असे सांगितले . स्मारकाचे पेंटींग करायचे आहे, पेंट साधा नसुन शिवाजी महाराज यांचा किल्ल्यावर आहे, त्यानुसार होणार आहे. या बांधकामात घाई नाही करता येत, दिड ते दोन वर्ष झाले, असे म्हटले असता निधीच्या उपलब्धते मुळे उशीर झाल्याचे गोतमारे यांनी सांगितले, परंतु मार्च ते एप्रिल महिण्या पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक स्थळाचे बांधकाम पुर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे आणि नगरसेवक हरिष तिडके यांनी दिलेले आश्वासन पुर्ण करणार काय ? या कडे शिवप्रेमींचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.