नागपूर :- धनोजे कुणबी समाज विकास महासंघाच्या वतीने अनेक सामाजीक उपक्रम गेल्या १२ वर्षापासून राबवित आहे. त्यापैकी महत्वाचा उपक्रम म्हणजे विदर्भस्तरीय समाज व उपवर युवक-युवती परीचय मेळाव्याचे आयोजन शानिवारी २४ जानेवारीला सकाळी ११ वाजता. संताजी सांस्कृतीक सभागृह, बुधवार बाजार, पाण्याच्या टाकीजवळ नागपूर येथे आयोजीत केलेला आहेत. महासंघाने विदर्भातील सर्व समाज मंडळात समन्वय साधण्याचे काम सुरू असून विदर्भात धनोजे कुणबी समाज महत्वाचे योगदान देत आहे. समाजातील विवाहाच्या समस्या दुर झाल्या आहेत. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील धनोजे कुणबी समाज जुळण्यास मदत झाली आहे याप्रसंगी स्नेहबंध नावाची रंगीत स्मरणिका प्रकाशीत करण्यात येणार असून त्यामध्ये उपवर युवक- युवती यांचे फोटो बायोडाटा संह प्रसिध्द करण्यात येईल. यावर्षी २१० उपवर युवक- युवतीची नावे स्मरणिकेत असतील. त्यामुळे समाजातील विवाहाची समस्या या उपक्रमामुळे दूर झाली आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने समाजबांधवांनी हजर रहावे. यावर्षीही सुध्दा विदर्भातील सर्व समाजबांधवांनी मेळाव्यात हजेरी लावावी. असे आवाहन महासंघाने केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे करणार असून या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मोहन मते, आमदार सुधाकर अडबाले, व अशोकराव जिवतोडे, अध्यक्ष श्री लिला बहुद्देशिय संस्था चंद्रपूर तसेच अनील गोवारदिपे, अधिवक्ता-नागपूर हायकोर्ट व रश्मी भुषण बेलेकर सदस्य बुटीबोरी नगर पंचायत हजर राहणार आहेत असे मधुकर श्यामराव ढोके अध्यक्ष- धनोजे कुणबी समाज विकास महासंघा तर्फे सांगितले. यावेळी दिनकर जिवतोडे, नारायण कुथे, सुरेशराव कुथे, देवराव टोंगे, नामदेवराव मोरे, नरेश बेरड, मारोतराव वांढरे दामोदर जोगी, रमेश ढोके, मोरेश्वर डहाके यांची उपस्थिती होती.
धनोजी कुणबी समाज विकास महासंघाच्या तर्फे विदर्भस्तरीय समाज व उपवर युवक -युवती परिचय मेळाव्याचे आयोजन शनिवारी
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.