spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान पोलीस स्टेशनचे डीबी पथक बरखास्त करून विभागीय चौकशी करा :रिपा.भीमशक्ती संघटनाची मागणी

कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करा 
कन्हान २० : कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत वाढलेले अवैध धंद्यांवर कारवाई करुन कन्हान पोलीस स्टेशनचे डीबी पथक तत्काल प्रभावाने बरखास्त करून त्यांची चल अचल संपतीची विभागीय चौकशी करून संपती शासन दरबारी जमा करण्यात यावी. व सखोल चौकशी करून दोषी डिबी पथकावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीचे निवेदन रिपब्लिकन भीम शक्तीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कन्हान विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना दिले. तसेच (दि.3 जुलै रोजी रिपब्लिकन भीमशक्ती संघटनेच्या वतीने अवैध धंदे बंद करा असे निवेदन देण्यात आले होते.त्यावर कन्हान पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केली. असे भारतीय संविधानाचे चौथा स्तंभ वृत्त पत्रात बातमी प्रकाशित झाले आहे असे भिमटे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून व अवैध धंद्यावर अंकुश लावून कारवाई करण्याचे आश्वस्त केले.
निवेदनात नमूद कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत वाळू, कोळसा, सुंगधित तंबाकु, जुगार,सट्टा, गांजा,देह व्यवसाय, अवैध दारु विक्री,एमडी अर्मलपदार्थ सारखे अवैध धंदे कन्हान पोलीस स्टेशनचे डीबी पथकाच्या आशीर्वादाने जोमाने शुरु आहेत. नशा करणाऱ्यावर व अवैध धंदे करणाऱ्यावर अपराधीत वृत्तीवर डीबी पथक पोलिसांचे साथ गाट असल्यामुळे, अपराधिक वृत्तीचे मनोबल वाढत आहेत.किंबहुना मनोबल फोफावत आहे .कन्हान पोलीस स्टेशन कार्यालयात अपराधिक वृत्तीचे वावर सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सस्ती लोकप्रियतेसाठी नाम मात्र कारवाई केलेली आहे. व डीबी पथकांमध्ये आतापर्यंत कार्यरत कर्मचाऱ्यानी कोणतेही मोठी कारवाई करण्यात आली नाहीं. या उलड मोठे अवैध धंदे जोमात सुरू आहे. त्यामध्ये कन्हान शहरा सह ग्रामीण भागात सत्रापुर सिहोरा, निलज खंडाळा, नरसाळा, पिपरी गाडेघाट, जूनिकामठी, घाटरोहणा, नांदगांव, एसंबा सह ग्रामीण भागात सट्टा घेणारे बुगी,सट्टा,जुगार,रेती, कोळसा, सुंगधित तंबाकु,गांजा,देह व्यवसाय, अवैध दारु विक्री,एमडी अर्मलपदार्थ सारखे मोठे अवैध धंदे डीबी पथकांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. तसेच डीबी पथकाला कोन अपराधी आहे हे माहिती आहे तसेच कोन इस्टीसितर आहे हे पण त्यांना माहिती आहे. तरी त्यांचा सोबत मध्य सेवन हे पोलीस स्टेशनचे बिल्डिंगच्या मागच्या परीसरातील खुले आम त्यांच्या फोर व्हिलर गाड्या मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अश्या अपराधी वृत्तीचे लोकान सोबत डीबी पथक बिंनदास मध्य सेवन करतात. तसेच बिनदास भर चौकात अवैध धंदे डीबी पथकाच्या मार्गदर्शनात चालू आहे. ज्यामुळे पोलीसांचा धाक अपराधिक वृत्तीच्या लोकांमध्ये कमी होत आहे. व सामान्य नागरिकात यामुळे पोलीसांची प्रतिमा मलीम होत आहे, आपण कन्हान पोलीस स्टेशनच्या सी.सी.टीवी फुटेज वरुन शहानिशा करु शकता. तसेच यामागे डीबी पथकांचे कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहार  असल्याची शक्यता नाकारता येत नाही, यामध्ये डीबी पथकाचे कर्मचाऱ्यांचे मोबाइल सीडीआर काढला तर अपराधिक व्यक्तीना संरक्षण देण्याचे पुरावे समोर येतील. अश्या कृत्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची भूमिका धुमिल होत आहे. तसेच डीबी पथक हे कित्येक प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी दिशाभूल केली आहे. अश्या अपराधी वृत्तीच्या लोकांनावर व पोलिसांची भूमिका धूमिल करणारे डीबी पथक कर्मचाऱ्यांवर आळा घालण्याचे अत्यंत गरजेचे आहेत. तरी आपण सक्षम प्राधिकारी अधिकारी कर्तव्य दक्ष न्यायप्रिय अधिकारी असल्यामुळे आपण वाढलेल्या कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत संपूर्ण अवैध धंद्यावर कारवाई करून. अपराधी वृत्तीच्या लोकांन वर मोका, मोकोका, एम.पि.डी.आय, तसेच विविध धारा लावून तत्काल कारवाई करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे गृह जिल्हा असून सुद्धा एका हाकेच्या अंतरावर कन्हान पोलीस स्टेशन आहे. व कन्हान पोलीस स्टेशनमध्ये डीबी पथक गुंडाच्या भूमिकेत आहे. वसुली निरंतर क्रम चालू याकडे महाराष्ट्रच्या गृहमंत्री यांनी विषेश लक्ष केंद्रीत करून विशेष पोलीस महानिरक्षक यांच्या मार्फत विभागीय चौकशी करण्यात यावी. सत्ते पुढे येईल. तसेच कन्हान पो.स्टे.अंतर्गत डीबी पथका मध्ये काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे वाल्याशी आर्थिक व्यवारात लिप्त असलेल्या दोषी कर्मचाऱ्यांना तत्काल प्रभावाने बरखास्त करून यांची चल अचल संपतीची विभागीय चौकशी करून यांची संपती शासन दरबारी जमा करण्यात यावी. व  सखोल चौकशी करून दोषी डिबी पथकावर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संविधानिक प्रक्रियेतून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची पोलीस प्रसाशनाने नोंद घ्यावी. अशी मागणी निवेदना द्वारे कन्हान विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना केली. यावेळी प्रामुख्याने मनोज गोंडाने, नितीन मेश्राम, रवींद्र दुपारे, राजेश फुलझेले, आनंद चव्हाण सह रिपब्लिकन भीमशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles