Monday, February 16, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हास्तरीय कौशल्य मेळावा उत्साहात ; 300 उमेदवारांनी केली नोंदणी

यवतमाळ :- सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी), सेंट्रल बँक ऑॅफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कौशल्य मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात एकूण 64 विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी जवळपास 300 उमेदवारांनी अर्ज भरून नोंदणी केली.

सेंट्रल सेलिब्रेशन हॉल, यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमाला आरसेटीचे संचालक दीपक तिवारी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक प्रीतम हस्ते, कौशल्य योजनेचे जिल्हा व्यवस्थापक अण्णासाहेब ढाकणे, बाभूळगाव उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक प्रशांत मोदी, दारव्हा तालुका व्यवस्थापक पराग वानखडे, कळंब तालुका व्यवस्थापक उमेश शिंदे, आर्णी तालुका व्यवस्थापक ललित राऊत, घाटंजी तालुका व्यवस्थापक विनोद मस्करे तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौशल्य मेळाव्याच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाली असून प्रशिक्षणार्थींनी कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर व्हावे व उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा. शासन व प्रशासन तुमच्या सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत मान्यवरांनी केले.

या मेळाव्यात सहभागी प्रशिक्षणार्थींनी आपल्या आवडीनुसार विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांची निवड केली असून, संबंधित प्रशिक्षण बॅच सुरू झाल्यानंतर पात्रतेनुसार त्यांची निवड करण्यात येणार आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांची केवळ प्राथमिक नोंदणी करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक संचालक दीपक तिवारी यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तेजश्री कडू यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com