Thursday, February 26, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरण

नवी मुंबई :- प्रत्येक गावाने ग्रामस्वच्छता अभियानातून गाव स्वच्छता, वृक्षलागवड यासाठी झटले पाहिजे तरच गावाचा पर्यांयाने देशाचा विकास होण्यास मदत होईल. गावातील प्रत्येक व्यक्तीने शाश्वत विकासाच्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा उद्देशच हा आहे की, गावाबरोबरच तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा शाश्वत विकास व्हावा, असे मत कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे व्यक्त केले.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व महाआवास अभियान- ग्रामीण अंतर्गत विभागस्तरावरील पुरस्कार वितरण आज सिडको सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण विभागाचे राजाराम दिघे, वक्ते म्हणून प्रशांत देशमुख, अपर आयुक्त (विकास) माणिक दिवे, सहायक आयुक्त प्रदीप घोरपडे यांच्यासह कोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मध्यंतरीच्या कोरोना काळात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व महाआवास अभियान 2018 ते 2024 पर्यंतचे पुरस्कार वितरीत करता आले नाही. परंतु आपण पुरस्कारासाठी न थांबता हा स्वच्छतेचा यज्ञ चालूच ठेवला याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन. आपल्या या ग्रामस्वच्छता अभियानाचा उद्देशच सर्व ग्रामीण व्यवस्थापन, ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सुधारणा व वृक्ष लागवड हा आहे, आणि म्हणूनच आज हे पुरस्कार वितरीत करण्यात येत असल्याचे सांगून विभागीय आयुक्त पुढे म्हणाले की, प्रत्येक ग्रामसभेत संत गाडगेबाबा यांची ग्रामगीता दर्शनी भागात लावली गेली पाहिजे जेणेकरुन या ग्रामगीतेत संत गाडगेबाबांनी स्वच्छता, वृक्षलागवडीचे महत्व विषद केले आहे. त्याची माहिती प्रत्येक व्यक्तीस होईल ग्रामगीतेतील 17 वा अध्यायाचे वाचन करुन त्याचे महत्व डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

व्याख्याते प्रशांत देशमुख म्हणाले की, तुम्ही कोणतेही काम करा, पण जेव्हा आपण एक झाड लावतो, ते काम वैश्विक असते, मला असे वाटते, मानवाचा संबंध थेट वसुंधरेशी असतो. मी स्वतःसाठी काही प्रगती केली, ती कदाचित माझ्यापुरतं, माझ्या कुटुंबापुरतं, गावापुरतं राहील. पण अशी कोणती गोष्ट आहे. की, जी थेट वैश्विक होते? म्हणजे, जसं आमचे संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं, त्यात त्यांनी विश्वात्मकतेसाठी मागण थेट देवाकडे मागितले. त्यांनी केवळ महाराष्ट्रातल्या माणसांसाठी नाही तर विश्वातल्या सगळ्यांसाठीच, मानवजातीच्या कल्याणासाठी आर्शिवाद पसायदानाच्या माध्यमातून मागितले. आपण आपल्या घराच्या परिसरात जरी एक झाड लावलं, भले ते आपल्याला फळ देईल, आपल्याला सावली देईल, पण त्याचा संबंध थेट विश्वाशी असतो.

यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामिण विभागाचे राजाराम दिघे यांनी आपले विचार मांडले. यानंतर विभागीय आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांच्याहस्ते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व महा आवास अभियान पुरस्कार वितरीत करण्यात आले.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती

2018-19 ग्रामपंचायतीचे नाव ग्रामपंचायत हुमरस, ता.कुडाळ, जि. सिंधुदूर्ग प्रथम क्रमांक, द्वितीय ग्रामपंचायत अंजनवेल, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, तृतीय ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदूर्ग.

2019-20 ग्रामपंचायत बापाडे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग प्रथम क्रमांक, द्वितीय ग्रामपंचायत परुळेबाजार, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदूर्ग.

2020-21 व 2021-22 ग्रामपंचायत परुळेबाजार, ता. वेंगुलां, जि. सिंधुदूर्ग, द्वितीय,

2019-20 ग्रामपंचायत नाचणे, ता.रत्नागिरी, जि. रत्नागिरी, तृतीय

विशेष पुरस्कार 2019-20, ग्रामपंचायत शिवकर, ता. पनवेल, जि. रायगड,

2020-21 व 2021-22 ग्रामपंचायत निरवडे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग प्रथम क्रमांक, ग्रामपंचायत खामशेत, ता. गुहागर, जि. रत्नागिरी तृतीय.

2020-21 व 2021-22 ग्रामपंचायत खामशेत, ता. गुहागर, जि. रत्नागिरी तृतीय.

2022-23 ग्रामपंचायत खामशेत, ता. गुहागर, जि. रत्नागिरी प्रथम.

विशेष पुरस्कार 2020-21 व 2021-22 ग्रामपंचायत टेंभी, ता. वसई, जि.पालघर

विशेष पुरस्कार 2020-21 व 2021-22 ग्रामपंचायत कॉडअसुडे, ता.संगमेश्वर, जि. रत्नागिरी

विशेष पुरस्कार 2020-21 व 2021-22 ग्रामपंचायत वडवळ, ता. खालापूर, जि. रायगड

2022-23 ग्रामपंचायत वडपे, ता. भिवडी, जि.ठाणे द्वितीय,

2022-23 ग्रामपंचायत जांभूळ, ता. कल्याण, जि.ठाणे तृतीय

विशेष पुरस्कार 2022-23 ग्रामपंचायत काशिद, ता. मुरुड, जि. रायगड

महा आवास अभियान सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद

सन 2011-22 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद तृतीय क्रमांक- जिल्हा परिषद पालघर,सन 2011-22 अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद पालघर,सन 2022-23 अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -तृतीय क्रमांक – जिल्हा परिषद पालघर,सन 2023-24 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -प्रथम क्रमांक जिल्हा परिषद पालघर,सन 2023-24 अंतर्गत राज्य प्रस्कृत आवास याजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -प्रथम क्रमांक जिल्हा परिषद पालघर,सन 2023-24 अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -तृतीय क्रमांक जिल्हा परिषद ठाणे,सन 2011-22 अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -तृतीय क्रमांक जिल्हा परिषद रायगड, सन 2022-23 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -तृतीय क्रमांक जिल्हा परिषद रायगड,सन 2023-24 अंतर्गत प्रधानमंत्री आवास याजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद तृतीय क्रमांक जिल्हा परिषद रायगड,सन 2023-24 अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद रायगड,सन 2021-22 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद – द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद रत्नागिरी, सन 2022-23 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद रत्नागिरी सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -सन 2022-23 अंतर्गत राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद -द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद रत्नागिरी, सन 2023-24 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद –

द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद रत्नागिरी आदी पुरस्काऱ्यांचे वितरण विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचलन तहसिलदार माधुरी डोंगरे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com