नागपूर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थापित “भारतीय बौद्ध महासभा” नागपूर जिल्हा महानगरच्या सभेत 2500 सभासद नोंदणी करण्याचा घेतला निर्णय ” दि. 9 मे 2026 रोजी, भारतीय बौद्धमहासभा नागपूर जिल्हा महानगरची सभा बाबूलबन येतील सुगत बुद्ध विहारात पार पडली. या वेळी सभेत 2500 सभासद नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असुन 6 विभागच्या कमेटया तयार करून, प्रत्येक विभागा मध्ये 4 ते 5 पदाधाकारी विभागाचे काम वाढविण्यासाठी नेमण्यात आले व दर रविवारी विभागात सभा घेण्याचे ठरले तसेच समता सैनिक दलाचे सभासद सभेला उपस्थित राहातील तसेच छोटा मोठया संघटना, भारतीय बौद्ध महासभे मध्ये विलीन करून घेण्याच्या चर्चा सभेत झाले. सर्व पदधीकाऱ्यांनी विचार विमर्श करून सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. सभेचे प्रमुख केन्द्रीय संघटक पद्माकरजी गणवीर होते तर नागपूर जिल्हा महानगरचे विजय मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थितीत पदधीकारी राज रक्षीत, सुध्दोधन धाबर्डे, प्रविण काबंळे, विशाल वानखेड़े, निरंजन वारकर, रविन्द्र एस डोंगरे, राहुल परूडकर, लक्ष्मीकांत मेश्राम, टार्जन ढवळे, राजीव मेश्राम, मनोज वाळके, छत्रपाल तामगाडगे, संघशिल मेश्राम, गंगाधर काबळे, संजय शेवाळे, करूण भारशंकर, विनय ढोके, नामदेवराव निकोसे, जितेंद्र पाटील इत्यादि भारतीय बौद्धमहासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थितीत सकारात्मक सभा पार पडली असे नागपूर जिल्हा महानगर संघठकचे रविन्द्र एस डोंगरे यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थापित “भारतीय बौद्ध महासभा” नागपूर जिल्हा महानगरच्या सभेत 2500 सभासद नोंदणीचा निर्णय
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.