spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मराठी साहित्य मंडळ संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. किरण नागतोडे

नागपूर :- मराठी साहित्य मंडळ संस्थेचे 15 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका डॉ.किरण कृष्णराव नागतोडे यांची निवड करण्यात आली आहे. त्या वर्धा शहरातील स्वावलंबी शिक्षण महाविद्यालयातून सहयोगी प्राध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे आतापर्यंत अठ्ठावीस हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहे. या संमेलनाचे उद्घाटन हिंगणघाट येथे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण अरुण थुटे ह्या करणार असून माजी संमेलनाध्यक्षा नागपूरच्या डॉ. पुष्पा तायडे ह्या अध्यक्षपदाची सूत्रे नागतोडे यांच्याकडे सोपविणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट, नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे उपस्थित राहणार आहे. तर माजी संमेलनाध्यक्ष अध्यक्ष डॉ. रेखा जगनाळे मोतेवार आणि डॉ. विनायकराव जाधव मुख्य अतिथी म्हणून राहतील. अशी माहिती पत्रपरिषदेत नागपूरच्या माजी प्राचार्य डॉ.पुष्पा तायडे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक प्राचार्य डॉ.बालाजी राजुरकर हिंगणघाट सोबतच डॉ. पुष्पा तायडे, डॉ.किरण नाकतोडे, डॉ.रेखा जगनाळे, नीता चिकारे प्राचार्य प्रभाकरराव कोळसे वर्धा जिल्हा अध्यक्षासह अनेक सदस्य यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

Popular Articles