बोरी :- अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक है नागपुर उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहीती दिली की, अंमली पदार्थ (मेफेड्रोन पावडर) ची देवाण घेवाण होणार आहे. नमुद पथकाने सदर माहीती बोरी पोलीसांना देत बोरी पोलीसांसह सयुंक्तीक कारवाई करत मिळालेल्या माहीतीच्या आधारे नमुद आरोपी शोध कामी सतर्क पेट्रोलींग केली सदर पथकाला बोरी पोलीस स्टेशन हद्दीत बोरखेडी फाटक कडे जाणाऱ्या रोडवर रेल्वे पुलीया च्या बाजुला साई ले आउटच्या मोकळ्या जागेत एक संशयास्पद कार दिसली. नमुद कार चालक पोलीस वाहनाला पाहुन कारसह पळुन गेला मात्र कारच्या बाजुला उभा असलेल्या आरोपीस पळुन जातांना पोलीसांनी शिताफिने पकडुन त्याचे नाव पत्ता विचारले असता मंगेश गोपाल भोंडगे, वय. ३४ वर्षे बंदा मजुरी, रा. मेटा उमरी पोस्ट, मोहगाव ता. हिंगणा जि. नागपुर अशी माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी पंचासमक्ष त्याची अंगहाडती घेतली त्याचेकडे अंमली पदार्थ मेफेड्रोन पावडर मिळुन आला.
नमुद आरोपीच्या ताब्यातुन १) अंमली पदार्थ मेफेड्रोन पावडर वजन ५२.३० ग्रॅम किंमती २,६१,५००/- रूपयांचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ मेफेड्रोन पावडर पुरवाठा करणारा आरोपीबाबत माहीती पोलीसांना प्राप्त झाली असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे.
नमुद प्रकरणी आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन बोरी येथे एन. डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.