नरखेड :- हर्षल ज्ञानेश्वर वाढीवे, वय २६ वर्ष, रा. बानोर ता. नरखेड जि. नागपूर यांनी फिर्याद दिली की, फिर्यादीचे वडील ज्ञानेश्वर वाढीवे, वय ६० वर्षे हे नरखेड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी गावातील ऑटो चालक सचिन श्रावण सातपुते याचे ऑटो क्र एम एच ४० पी २४०२ ने बानोर येथून तपनी येथे कार्यक्रमा करीता वांगेचे बोरे घेऊन गेले होते. काम आटोपुन तपनी येथुन सायंकाळी अंदाजे ०८/०० वा. चे दरम्यान त्याचेच ऑटोने बानोर गावी परत येत असता सावरगाव शिवारात राजनी रोडने त्यांचा ऑटो पलटी होवुन ऑटोचा अपघात झाला त्यामध्ये फिर्यादीचे वडील मरण पावले, आरोपी ऑटोचालक सचिन श्रावण सातपुते, वय ३२ वर्षे, रा. बानोर याला दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अपघात होवुन मृत्यु होवु शकतो हे माहीती असतांना सुध्दा त्याने त्याच्या ताब्यातील ऑटो क्र एम एच ४० पी २४०२ दारूच्या नशेत निष्काळजीपणाने चालविल्याने सदर अपघात होवुन फिर्यादीच्या वडीलांचा मृत्यु झाला.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी वाहन चालकाविरूद्ध कलम १०५, भान्यासं २०२३ सहकलम १८४, १८५ मोटर वाहन अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी ऑटो चालकास अटक करण्यात आली आहे.