नागपूर :- सत्यमेव जयते शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर द्वारा आयोजित एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठया थाटात संपन्न झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने उपस्थित यांचे मनमोहन टाकले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक कलाकृतीवर उपस्थित आणि भरभरून दाद दिली. शाळा सतत विद्यार्थ्यांच्या कलाना वाव देत असते. मुलातील सुप्त गुण शोधून त्यांना प्रोत्साहित करत असते. त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा प्रदीप मानवटकर यांचा सेवानिवृत्ती सोहळा सुद्धा पार पाडण्यात आला. त्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा कलिता हिरेखन, सचिव दशरथ बनसोड, सहसचिव टीकाराम शेंडे, संस्थेचे पदाधिकारी व चारही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी कातुरे, सुनीता गावंडे, जयमाला धोटे, धनश्री ढेगेकर, शरद उरकुडे यांनी प्रयत्न केले.








