Friday, January 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मोठ्या भावाने धाकट्याची केली निर्घून हत्या

– बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील थरारक घटना 

– आईवडिलांसह मोठा भाऊ अटकेत

चंद्रपूर :- दारू पिऊन घरी कुटुंबात नेहमी वाद होत होता. यामुळे घरातील कुटुंबियांना त्रास होत होता. अशाच वाद बुधवारी रात्री झाला. वादाचे पर्यवसान कडाक्याच्या भांडणात झाले. राग अनावर झाल्याने मोठ्या भावाने धाकट्याच्या डोक्यावर वासल्याने जबर वार निर्घून हत्या केली. ही थरारक घटना बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बुधवार ( दि. ८ ) रात्री ९.४५ वाजता घडली. विशेष म्हणजे या हत्याकांडातील पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने मृतकाचे शव रेल्वे मार्गावर टाकण्यात आले. मृतक धाकट्या भावाचे नाव गणेश विश्वनाथ भोयर ( वय -२५ ) रा.इंदिरा नगर वार्ड विसापूर ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर असे आहे.

या घटनेतील प्रकरणात आरोपी म्हणून भाऊ गुरूदास विश्वनाथ भोयर ( २७ ), वडील विश्वनाथ झुंगा भोयर ( ७१ ) व आई कौशल्या विश्वनाथ भोयर ( ५५ ) यांना बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विश्वनाथ भोयर यांची कौशल्या ही दुसरी पत्नी आहे. त्यांना पहिल्या पत्नीचे दोन मुले व दुसऱ्या पत्नीचे दोन मुले आहे. यातील पहिल्या पत्नीचे दोन्ही मुले वेगवेगळे राहत आहे. मात्र विश्वनाथ, कौशल्या,गुरूदास व गणेश एकत्र राहत होते. बुधवारी रात्री गणेश व गुरूदास या भावंडांत दारू पिऊन भांडण झाले.भांडणादरम्यान वाद विकोपाला गेला.रागाच्या भरात गुरूदासने गणेशच्या डोक्यावर लोखंडी वासल्याने जबरदस्त प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात गणेश जागीच कोसळला. तो मृत झाल्याची खात्री झाल्यावर घरातील तिघेही शांत झाले. विशेष म्हणजे घटनेची माहिती शेजाऱ्यांना देखील झाली नाही.

मध्यरात्री १२ ते १ वाजता दरम्यान खुनातील पुरावे नष्ट करायची योजना आरोपींनी आखली. गुरूदास भोयर याने मृतक गणेश च्या पायाला दोरी बांधून गोंदिया – बल्लारपूर रेल्वे मार्गावर ओढत नेले. हा प्रकार रात्री गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचारी दामाजी नरोटे यांच्या लक्षात आला. त्याने रात्री या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.रेल्वे पोलिसांनी बल्लारपूर ठाण्याच्या पोलिसासोबत संपर्क साधून घटनेबाबत अवगत केले. घटनेचे गांभीर्य ओळखून बल्लारपूर पोलिसांनी सकाळी डाग स्कॉड पाचारण करून हत्याकांडातील माग काढला.त्यावेळी पोलिसांना जबर धक्का बसला. ज्या ठिकाणी गणेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ति जागा सारवण करून स्वच्छ करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. संगनमत करून आई,वडील व मोठ्या भावाने धाकट्याच्या काटा काढल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात बि.एन.एस.कलम १03,२3८,3 (५ ) अन्वये गुन्हा दाखल करून गणेश चा मोठा भाऊ गुरूदास, वडील विश्वनाथ व आई कौशल्या भोयर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड, वैभव चव्हाण, संतोष एनगंदेलवार,विसापूर चौकीचे अजय झाडे, विजय मैंद व पोलीस कर्मचारी करत आहे.

पैशाचा वाद घटनेला कारणीभूत असल्याची चर्चा

गणेश भोयर याची आई कौशल्या हिचे वडिलोपार्जित घर गोंडपिपरी येथे होते. त्या घराची विक्री झाली होती. त्यातील ७ लक्ष रूपये कौशल्या भोयर यांच्या हिस्याला आले. त्या पैशातून नवीन घर बांधून घ्यावे.असे कुटुंबात ठरले. मात्र याच पैशाच्या कारणावरून दोघा भावंडांत भांडण उकरून निघत होते.दारूच्या व्यसनात पैशा खर्च होईल. याची भीती कुटुंबात होती.हाच वाद कडाक्याच्या भांडणात झाला.हाच वाद हत्याकांडात कारणीभूत असल्याची चर्चा नातेवाईकांत केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com