spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोरी घिवारी जि प प्राथमीक शाळेत मान्यवरांच्या उपस्थित प्रवेशोत्सव सोहळा 

किशोर साहू, मौदा :- बोरी घिवारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत करत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. मंगळवार (३० जून) ला इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्ववत सुरू झाली. या निमित्ताने आयोजित ‘प्रवेशोत्सव’ सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी सरपंच ग्रा.प. बोरी घिवारी विशाल सेलोकर, शाळा समितीचे अध्यक्ष कैलास झलके, प्रमुख पाहुणे कैलास राघोर्ते,तेजराम पिंगळे केंद्र प्रमुख, बोरी घिवारी केंद्र लोकेश परतेकी सह गावातील पालक वर्ग व उत्साही चिमुरडे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आनंदमयी सोहळ्याला सर्वांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा पहिला दिवस अतिशय संस्मरणीय ठरला.

Popular Articles