spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विकासाच्या प्रक्रीयेत सर्वांचा सहभाग आवश्यक  – वस्त्रोदयोग मंत्री संजय सावकारे 

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- जिल्हयाचा विकास ही एक सामुहिक प्रक्रीया असुन या प्रक्रीयेत शासन, प्रशासनासोबतच नागरिकांचा ही सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन वस्त्रोदयोग मंत्री संजय सावकारे यांनी आज केले.

पोलीस मैदानात आयोजित 77 व्या मुख्य प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. मंत्री महोदयांनी पायलट कारमधून परेडचे निरीक्षण केले. त्यांनतर पोलीस, गृहरक्षक दल, श्वानपथक,शालेय विदयार्थी यांच्यासह विविध पथकांनी मानवंदना दिली.जिल्हा माहिती कार्यालयाच्या शासकीय योजनांची प्रसिध्दी करणा-या चित्ररथाला सावकारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सावनकुमार,मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे,पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह, अतिरीक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव ,निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण उपस्थित होते.

जिल्हयातील विविध विकासकामाच्या प्रगतीचा आढावा सावकारे यांनी भाषणात मांडला.यावेळी जिल्हयातील गृह विभागाच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.पोलीस अधिक्षक कार्यालयाव्दारे प्रकल्प दिशा या उपक्रमाव्दारे विदयार्थ्याना एमपीएससी,युपीएससी परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येते ,या उपक्रमांचे तसेच पोलीस विभागातर्फे कार्यरत सायबर चॅटबोटची देखील त्यांनी प्रशंसा केली.

मत्सव्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्यजिरे निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगुन मत्सय्उत्पादन हे या जिल्हयाचे ग्रोथ इंजीन ठरणार असल्याचे ते म्हणाले. 2024-25 मध्ये 460 लक्ष मत्स्यबीज संचयन करून त्यापासून 9597 मेट्रीक टन उत्पादन घेण्यात आले असून त्याव्दारे मच्छीमारांना रोजगार तसेच जिल्हयातील नागरिकांना प्रथिनयुक्त सकस आहार उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले

ग्रामीण भागातील विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्ट्रीकोन वाढविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२४-२५ अंतर्गत नाविण्यापूर्ण योजनेतून अनुसूचीत जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा राजेदहेगाव येथील ४० विद्यार्थ्यांनींना विमानप्रवासाव्दारे श्रीहरीकोटा (ISRO) येथे नेण्यात आले.विदयार्थीनींच्या वैज्ञानिक आवडीला चालना देण्यासाठीचा हा प्रयोग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हयातील 100 गावांची जलयुक्त शिवार टप्पा दोन या अभियानात निवड करण्यात आली आहे.त्यामध्ये या विभागाकडील 75 कामे 1078 लक्ष रूपये चा समावेश आहे.या योजनेमुळे 2142.44 हेक्टर संरक्षीत सिंचनाचा लाभ होणार आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाच्या दुस-या टप्पयात 82 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन 38 कामे प्रगतीपथावर आहेत. तर हर घर जल योजनेंतर्गत जिल्हयातील एकूण 2 लाख 56हजार 684 कुटुंबांपैकी 2 लाख25 हजार 797 कुटुंबांना कार्यात्मक नळ जोडणी देण्यात आली आहे.अशाप्रकारे जिल्हयातील एकूण कुटुंबापैकी 87.97 टक्के कुटुंबाना नळ जोडणी देण्यात आली आहे.तसेच जिल्हयातील एकूण 246 गावे हर घर जल प्रमाणित करण्यात आली असल्याचे वस्त्रोदयोग मंत्री यांनी सांगितले.

भंडारा जिल्हयातील उमेद अभियांनाव्दारे महिलांना सक्षमीकरण करण्यात येत असून शिखर महिला प्रभाग संघाला ग्रामविकास विभाग ,भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय आत्मनिर्भर संघटन प्रथम पुरस्कार 15 ऑगस्ट 2025 रोजी तेथील पदाधिकारी दिल्ली येथे ग्रामविकास मंत्री भारत सरकार यांच्याव्दारे पुरस्कृत करण्यात आले,ही जिल्हयासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

जिल्हयाच्या अर्थव्यवस्थेसाठी उदयोग महत्वाचे असुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2025-26मध्ये 320 लाभार्थ्याना कर्ज मंजुर करण्यात आले आहे.त्यापैकी 88 लाभार्थ्याना 221 लक्ष मार्जिन मनी वाटप करण्यात आले आहे.

जिल्हा गुंतवणुक परिषदेत 43 सामंजस्य करार करण्यात आले.याव्दारे 470.65 कोटीची गुंतवणुक करण्यात येणार आहे.पैकी 30 सामंजस्य करार कार्यान्वित झाले आहे.त्यांची गुंतवणुक 144 .75 कोटी रूपये असल्याचे सावकारे यांनी सांगितले.भाषणाच्या शेवटी विकास ही एक सामूहिक प्रक्रिया असून त्यासाठी जिल्ह्यातील शासन यंत्रणे सोबतच प्रशासन आणि जिल्ह्यातील नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आणि भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकवर राहण्यासाठी सर्व नागरिकांचे देखील या विकास प्रक्रियेत शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विविध शाळांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

Popular Articles