spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माजी सैनिक आणि समता सैनिक दल यांचा संयुक्त विद्यमाने शौर्य दिवस साजरा

कन्हान :- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माजी सैनिक आणि समता सैनिक दल कन्हान यांचा संयुक्त विद्यमाने गुरवार (दि.१) जानेवारी रोजी शौर्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित माजी सैनिक पंजाब पाटील, जयवंत गटपाडे यांचा हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या जयस्तंभा ला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी जयवंत गटपाडे, पंजाब पाटील, सम्राट पगारे यांनी भीमा कोरेगाव ऐतिहासिक लढाई बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित समाज बांधवांनी महार सैनिकांच्या समर्थनात विजय स्तंभाला मानवंदना देऊन लढाईत शहिद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.याप्रसंगी माजी सैनिक जयवंत गटपाडे, सम्राट पगारे, विलास मेश्राम, पंजाब पाटील, नागसेन मानकर, पदमाचंद पंचभाई, इंद्रपाल कांबळे, दिलीप तायडे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Popular Articles