spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागलवाडी येथे शेतकरी सन्मान सोहळा, स्वः सुमनबाई सराटे मित्र परिवाराचा उपक्रम

खापा :- नागलवाडी येथे (दि. २६) रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात शेकडो शेतकऱ्यांना सन्मानीत करण्यात आले.

स्वर्गीय सुमनताई सराहे वाचनालय व मित्र परिवाराच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रमू कारोकार तर अतिथी म्हणून सरपंच दिपाली ठाकरेया होत्या. उपसरपंच भारती उईके, ग्रामपंचायत सदस्य शकुन जगणे, जयश्री सोनभद्रे, शिवानी उईके, अमोल धुर्वे, सुनील भलावी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर टेकाम, किरण धुर्वे, राजकुमार भलावी, लक्ष्मण आहाके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व शेतकऱ्यांना शेतकरी दुप्पटा प्रधान करून गौरवण्यात आले, ग्रामविकास अधिकारी एस. एल, डाबरे व कृषी सहाय्यक कस्तूरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

“शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी योजना”

शासन शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याकरीता विविध कल्याणकारी योजना बाबत माहिती दिली जाते. यासाठी कृषी विभाग नेहमी तत्पर असल्याचे प्रतिपादन कृषी सहाय्यक कस्तुरी यांनी व्यक्त केले.

“विकसीत भारत जी राम जी”

रोजगार हमी योजने‌चे सुधारीत नाव ठेवण्यात शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करून देतांना ग्रामविकास अधिकारी एस. एल. डाबरे यांनी ग्रामपातळीवर १२५ दिवस, रोजगार उपलब्ध करून देव्याबाबतची माहीती सांगीतली, व सदर योजना यानंतर “विकसीत भारत- जी राम जी” नावाने राबविण्यात येत आहे अशी माहिती दिली.

याप्रसंगी सरपंच दिपाली ठाकरे, समाजसेवक संजय गिरमेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश सराटे यांनी केले, तर अंश भलावी यांनी आभार मानले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी, आयूषा कोवाची, अक्षय डोंगरे, रोशन ऊईके व शाळेच्या विद्यार्थीनी मोलाचे सहकार्य दिले.

Popular Articles