तिरोडा :- भारत देश कृषिप्रधान म्हणून ओळखले जाते देशात सर्वात जास्त प्रमाणात शेती व्यवसायाशी लोक जुळलेले आहेत.
देशांचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांची एक वेगळीच ओळख निर्माण आहे.
शेतीतून उत्पादन काढून त्यावर आपली उपजीविका शेतकरी करीत असतात .शेतीतुन राब राब घाम गाळुन शेतकरी पिकाची लागवड करत असतात.तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा येथील शेतकरी रामू डोंगरवार यांनी आपल्या शेतात कावेरी 468 या धान पिकाची लागवड केली 125 दिवसाचे ही धान पिकाची जात असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची लागवड केल्याने पहिल्यांदाच या पद्धतीचे धान्य घाटकुरोडा परिसरात शेतकऱ्यांनी लावल्याने शेतात धान पीक भरभरून आल्याने शेतकऱ्याचे धान्याचे पिक सध्या चर्चेच्या विषय ठरत आहे.
कावेरी 468 जातीच्या धान या शेतकऱ्यांनी लावल्याने शेतात भरघोस असे धान्याची पीक आल्याने शेतकरी सुद्धा आनंदी असून या कावेरी 468 नामक धान्याचे पिकांची लागवड इतर शेतकरी सुद्धा करावी असे रामू डोंगरवार या शेतकऱ्यांनी आव्हान केले आहे.




