spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दारव्हा व कळंब येथे वित्तीय साक्षरता समावेशन अभियान

यवतमाळ :- वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार, बँक ऑफ इंडिया, नागपूर विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यवतमाळ यांच्या वतीने दारव्हा आणि कळंब येथे वित्तीय साक्षरता समावेशन अभियान यशस्वीपणे पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात सुनीलकुमार पांडे (क्षेत्रीय प्रबंधक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अमरावती यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करताना विविध बँक योजनांची माहिती दिली उपस्थितांना थोडक्यात समजावून सांगितले.

श्रीराम भोर, महाप्रबंधक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, छत्रपती संभाजीनगर यांनी Re-KYC प्रक्रिया, त्याचे महत्त्व तसेच डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

यानंतर प्रादेशिक संचालक सचिन वाय. डे (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर) यांनी वित्तीय समावेशन सॅच्युरेशन कॅम्प विषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी Re-KYC, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY) तसेच महिला स्वयं-सहायता गट (SHG) यांसारख्या योजनांचे महत्त्व अधोरेखित करत खात्याची नियमितता व विमा योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

लाभार्थ्यांना लाभ वाटप:दारव्हा येथे महिला बचत गटाच्या सदस्यांना उमेद अंतर्गत कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.कळंब येथे PMSBY योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण प्रादेशिक संचालकांच्या हस्ते पार पडले.

दारव्हा व कळंब येथील ग्रामीण भागातील नागरिक तसेच महिला स्वयं-सहायता गटांच्या सदस्यांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वित्तीय साक्षरतेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना Re-KYC, विमा योजना, पेन्शन योजना आणि डिजिटल वित्तीय सेवा यांविषयी माहिती देऊन वित्तीय समावेशात वाढ करणे व अधिकाधिक लाभ मिळवून देणे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सचिन बाप से प्रादेशिक संचालक रिझ. बैंक ऑफ इंडिया, नागपूर, सुनीलकुमार पांडे, क्षेत्रिय प्रबंधक, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, अमरावती,  प्रशांत एकुडे, क्षेत्रिय प्रमुख, भारतीय स्टेट बँक, यवतमाळ, श्रीराम भौर, महाप्रबंधक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, छत्रपती संभाजी नगर, पियुष वात प्रबंधक रिकार्ड बैंक ऑफ इंडिया, नागपूर, राजीवकुमार श्रीवास्तव, उपक्षेत्रीय प्रमुख बैंक ऑफ बडोदा, अमरावती याशिवाय विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी, MSRLM, माविम, सीएफएल केंद्रांच समन्वयक व बिझनेस करस्पॉन्डेट्स यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

Popular Articles