यवतमाळ, संजय कारवटकर १६ : राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प.उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश केंद्र शाळा धानोरा येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या लिपीक पल्लवी सुभाष वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून धानोरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर यांनी आपला मान देऊन तिरंगी झेंड्याला एकप्रकारे मानवंदना दिली.
त्यानंतर स्वातंत्र्यदिनाचे महत्व शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पटवून दिले. त्यामध्ये साची मानकर, स्वरा कुमरे,सर्वज्ञ शेंडे, पियुष सरकार, रुचिता डडमल, दिव्यांशी घीनमीने, वंशिका कामडी, देविका बोरकर, रिया काटवले, त्रिशा वाघ, हार्दिका घोडे, श्वेता पवार, अमर मंडाळी, रणवीर कुळसंगे, हर्षदा बावनकर, मेहक घीनमिने, स्नेहीत किन्हेकर, नैतिक गुरनुले, आर्यन मेश्राम, भाविक पोटभरे, स्वीटी पवार, मोहित घीनमिने, लोमेश्वरी गेडाम, हर्षदा देवतळे, ईशिका पोटभरे,स्वतंत्र ढाले, ऐश्वर्या कुमरे, समीक्षा तीमांडे, धनश्री कुमरे, भूषण मेश्राम,तनश्री कारवटकर, जिविका बावणे, या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन स्वातंत्र्यदिनाचे महत्व पटवून दिले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणप्रेमी सदस्य बाबाराव घोडे यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. व तसेच स्वर्गीय डॉ.देविदासजी येनोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षय येनोरकर यांच्या कडून धानोरा जिल्हा परिषद शाळेतील वर्ग चौथीतून जो विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्याला दरवर्षी एक हजार रुपये पारितोषिक देण्याचे ठरवले आहे. यावेळी यावर्षी चा हा एक हजार एक रुपयाचा पुरस्कार चौथ्या वर्गातून पाचव्या वर्गात गेलेली हार्दिका प्रमोद घोडे या विद्यार्थ्यांनीला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कारवटकर, उपाध्यक्ष दिक्षाताई मुन,सदस्य मालाताई कुमरे,पालुताताई कापटे, अनिताताई कापटे, अंजनाताई कुळसंगे, अर्चनाताई साखरकर, सोनालीताई वरुडकर,दशरथ बिटे, अविनाश साखरकर, राजू मेश्राम, शंकर कन्नाके,शिक्षण प्रेमी सदस्य बाबाराव घोडे ,संदीप ढेकणे,रमेश कुळसंगे तसेच ,उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजयकुमार लांबट, शिक्षक संदीप टूले, रत्नमाला धुर्वे, रीना चौधरी, प्रणाली रडके,अविनाश ठाकरे तसेच विशेष शिक्षक दीपेश शेंडे व शिक्षक स्वसेवक योगेश घोडे तसेच मदतनीस विजय मेश्राम हे सर्व उपस्थित होते




