spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी बार्टी आणि एमसीईडीच्यावतीने मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अप्लाइड आर्टिफिशीयल इंटेलिजेंस रोबोटिक्स आणि आय.यो. टी तसेच डिजिटल मार्केटिंग वर आधारित एक आणि दोन महिन्याचे मोफत तांत्रिक अनिवासी उद्योजकता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 24 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, सामाजिक न्याय भवन दिक्षाभूमी रोड, शासकीय आयटिआय समोर, नागपूर येथे एक दिवशीय परिचय मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवहान, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूरचे विभागीय अधिकारी एच. आर. वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा या तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणात संबंधित विषयाचे प्रॅक्टिकल सह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे उद्योग उभारणी कशी करावी, शासकीय कर्जविषयक /अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा लायसन आदीं विषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा 18 ते 45 वयोगटातील असावा, तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, किमान 10 वी उत्तीर्ण, एक महिना व अभियांत्रिकी, पॉलीटेक्निक, एमसीए, बीसीए, एमएससी, बीएससी दोन महिने कालावधीच्या प्रशिक्षणा करिता शिक्षण घेतलेले असावे, तो गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार / रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहिती करिता संगीता ढोणे (9168667179, 9823960546) यांचेशी संपर्क साधावा किंवा एमसीडीच्या www.mced.co.in/Barti या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन एच. आर. वाघमारे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.