किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर तिजारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अतुल धोत्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी सहशिक्षक निलेश जाधव यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा दिली.
प्रमुख पाहुणे अतुल धोत्रे यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व आणि समाजसुधारणेसाठी महात्मा फुले यांचे योगदान अधोरेखित केले. अध्यक्ष प्रभाकर तिजारे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगती करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास माता-पालक संघाच्या प्रमुख निशाताई कातोरे, शिक्षक, व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षकांनी केले.