कन्हान २२ : – टोल नाकाच्या दोनशे किमी अंतरावर नाग पुर जबलपुर महामार्गाच्या बाजुला उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीतुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी १.६५ लाखांचा मुद्देमाल चोरुन पळुन गेल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवार (दि.१८) जुलै ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान नियाज सिद्धिकी (४०) आणि अंसारी इलाय गकुंचु दोन्ही रा. केरला हे कार क्रमांक के.एल.२९. टी. ०००८ ने चंडीगढ़ ला जाण्याकरिता निघाले होते. सोम वार (दि.२१) जुलै ला पहाटे सकाळी ३ वाजता कन्हा न टोल नाका पार करुन दोनशे किमी अंतरावर महामा र्गाच्या बाजुला ला कार उभी करुन वाहनात झोपले होते. सकाळी ६:३० वाजता झोपुन उठल्यावर त्यांना कारची डिक्की खुल्या अवस्थेत दिसुन आली. वाहना तील समानाची पाहणी केली असता दोन काळ्या रंगा च्या बैग, राडो कंपनीची घडी किंमत ५०,००० रुपये, दोन अंगुठी ५०,००० रुपये, रोख रक्कम ६५००० रुप ये असा एकुण १,६५ ,००० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कारच्या डिक्कीतुन १,६५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन पळुन गेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.




