कन्हान :- अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक हे नागपुर ते जबलपुर रोडने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने अंमली पदार्थ गांजा बाबत खात्रीशिर माहीती दिली. नमुद पथकाने सदर माहीती कन्हान पोलीसांना देत कन्हान पोलीसांसह सयुक्तीक कारवाई करत मिळालेल्या माहीतीच्या आधारे नमुद आरोपी शोध घेणे कामी सतर्क पेट्रोलींग केली. सदर पथकाला पोस्टे कन्हान हद्दीतील टेकाडी उडाण पुला जवळील हनुमान मंदिर बस स्टॉप जवळ दोन ईसम ट्राली बॅग घेवुन संशयितरित्या उभे दिसले. नमुद इसमांना विचारपुस करता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीसांनी पंचासमक्ष त्यांचेकडील दोन ट्रॉली बॅगची इझडती घेतली असता त्यात अंमली पदार्थ गांजा मिळुन आला. नमुद आरोपीतांना नाव पत्ता विचारले असता १) अमीत रामदीन रयकवार, वय ३४ वर्षे, रा. ग्राम करवी, जि. चित्रकुट, राज्य उत्तरप्रदेश, २) अमितेंद्र उर्फ जितु जयकरणसिंह यादव, वय २८ वर्षे, रा. एच.पी. पेट्रोलपंप जवळ, यादव डेरा, ग्राम पैलानी डेरा पैलानी, जि. बांदा राज्य उत्तरप्रदेश अशी माहीती पोलीसांना प्राप्त झाली.








