spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शासकीय रक्तपेढीने गाठला ३० हजार रक्तसंकलनाचा टप्पा

– सिकलसेल, थॅलेसिमिया सारख्या दुर्धर आजाराच्या रुग्णांना मिळाला लाभ

यवतमाळ :- श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथिल रक्तकेंद्र विभागांमार्फत २०२५ या वर्षात १० हजार २६१ रक्तदात्यांचे रक्तसंकलन करण्यात आलेले आहे. मागिल ३ वर्षामध्ये रक्तकेंद्र विभागाने ३० हजारापेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करुन गरजू रुग्णांना पुरवठा केलेला आहे.

महाराष्ट्रामध्ये रक्तदान मोहिम मोठ्या प्रमाणावर चालते, जिथे सामाजिक, राजकीय संस्था, महाविद्यालये, आणि सरकारी यंत्रणा रक्तदान शिबिरे आयोजित करतात, पण अजूनही गरजेच्या तुलनेत रक्ताचा तुटवडा जाणवतो, ज्यामुळे रक्तदान च श्रेष्ठदान’ हे ब्रीदवाक्य केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात आणण्यासाठी जनजागृती आणि सातत्यपूर्ण रक्तदात्यांची गरज आहे: आजही रक्तदानाच्या बाबतीत महाराष्ट्र हे इतर राज्याच्या तुलनेत स्वयंपूर्ण आहे. परंतु कोविड काळानंतरची परिस्थिती व बदलते राजकीय समिकरकण यामुळे रक्तसंकलनाच्या संख्येत बरीच कमतरता आली आहे. याकरीता सरकारी यंत्रणा तसेच विविध सामाजिक संस्था अथक प्रयत्न करुन लोकांमध्ये जाऊन जनजागृती करुन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यास मदत करत आहेत.

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढीचा मागिल काही वर्षांचा इतिहास बघितला तर असे निदर्शनास येईल की या संस्थेने प्रत्येक वर्षी आपल्या मागणी प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन निरंतर रक्त संकलन करुन गरजू रुग्णांची रक्ताची मागणी पूर्ण केलेली आहे. याही वर्षी म्हणजेच डीसेंबर २०२५ पर्यंत या रक्तपेढोने १० हजारपेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन करुन एक उत्कृष्ठ कार्य केलेले आहे.

यवतमाळ जिल्हा हा आदिवासी मागास जिल्हा म्हणुन ओळखला जातो, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफीलीया अशा प्रकारचे दुर्धर आजार असणारे रुग्णही या जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात आहे. तसेच ईतरही असे रुग्ण असतात ज्यांना तातडीने रक्तपुरवठा करण्याची आवश्यकता असते. अशा वेळेस शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातुन त्यांना रक्त पुरवठा करण्यात येतो.

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील रक्तपेढीने एका वर्षात अनेक वेळा १० हजार पेक्षा जास्त रक्तदात्यांचे रक्तसंकलन केलेले आहे. परंतु सदर निरंतर उपक्रम राबविणे हे सामुहिक प्रयत्नाचे यश आहे. या मध्ये समाजातील विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी संस्था, शासकीय यंत्रणा. रुग्णालय प्रशासन, रक्तपेढीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घेतेलेल्या परिश्रम आणि योगदानामुळेच हि रक्तपेढी निरंतर रक्तसंकलन करण्यात यशस्वी होत आहे. या निमित्ताने शासकीय रक्तपेढीच्या वतीने सर्व रक्तदान शिबिर आयोजक तथा एच्छिक रक्तदाते यांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रक्तकेंद्र विभागात कार्यरत असलेले समाजसेवा अधीक्षक आशिष खडसे व आशिष दहापूते यांचेशी संपर्क साधावा.

अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके, वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, व विभाग प्रमुख डॉ. विकास येडणिकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण भारती, डॉ. निलिमा लोढा, डॉ. संजय खांडेकर व रक्तकेंद्र प्रमुख डॉ. जयवंत महादानी यांच्या मार्गदर्शनात डॉ. विशाल नरोटे, डॉ. इरफ़ान तुघलक, डॉ. दीपिका बानानी सहाय्यक प्राध्यापक, यांच्यासह रक्तकेंद्र विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वी रक्तसंकलानात मोलाचे योगदान दिलेले आहे.

Popular Articles