spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सावंगी (बु.) व सावंगी (खुर्द) गावात एसबीआय फाउंडेशनच्या पुढाकारातून “ग्राम सक्षम” प्रकल्प साकार

– पावसाच्या पाण्याचे संधारण, संवर्धन व भूजल पुनर्भरण कार्य द्वारा ग्राम सक्षमता साध्य; ग्राम व कृषी अर्थव्यवस्थेला मजबुती प्राप्त

नागपूर :- एसबीआय फाउंडेशनच्या ‘ग्राम सक्षम’ प्रकल्प अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सावंगी (बु) व सावंगी (खुर्द) या कोरडवाहू व पाणी टंचाई ग्रस्त गावात पावसाच्या पाण्याचे संधारण, संवर्धन व भूजलाचे पुनर्भरण प्रकल्प कार्य साकार झाले. या प्रकल्पा अंतर्गत जलस्त्रोत सावंगी नाल्याचे वाटरशेड विकास आधारित नाल्याचे गाळमुक्तीकरण, खोलीकरण व रुंदीकरण कार्य सदभावना ग्रामीण विकास संस्था, वर्धा यांचे माध्यमातून पूर्ण झाले.

या कार्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील जलस्त्रोताची साठवण क्षमता व भूजल पुनर्भरण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण व कृषि क्षेत्रासाठी पिण्याचे पाणी, घरगुती वापराचे पाणी, पशुपालनासाठी पाणी व शेती करिता खरिप व रब्बी पिका करिता आवश्यक संरक्षित सिंचनाचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहे. ज्या प्रमाणे पाण्याच्या दुष्काळापासून परिसर दुष्काळमुक्त झाला त्याच बरोबर जलस्रोताच्या विकासामुळे पावसाच्या पाण्याचा पुरामुळे दरवर्षी होणारे नुकसान टळले आहे.

या पुरमुक्त व दुष्काळमुक्त स्थितीमुळे ग्रामीण व शेतकरी लोकांचे अर्थकारन वाढत्या उत्पादनामुळे व वाढलेल्या उत्पनामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. या प्रकल्पामागे प्रेरणा विकास पुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची असून सहयोग पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था, माध्यमातून करण्यात आली.

या जलसंधारण कार्या व्यतिरिक्त, एसबीआय फाउंडेशनने त्यांच्या सीएसआर निधीतून गावात “किसान भवन” देखील निर्माण केले. या इमारतीचा उद्देश गावकऱ्यांना एक सामायिक व्यासपीठ प्रदान करणे आहे जिथे ते एकत्रितपणे शेती, पाणी व्यवस्थापन आणि इतर समस्यांवर चर्चा करु शकतात. ही इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये खुर्चा, टेबल, इंटरनेट, शुद्ध पाण्याचे फिल्टर आणि इतर सर्व आवश्यक वस्तूंचा समावेश आहे आणि त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक ग्रामस्थांवर सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पात कृषी उपजीविका मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राच्या एक दिवसाच्या अभ्यास दौऱ्या‌द्वारे ग्रामस्थांना कृषी आणि पूरक व्यवसाय व्यवस्थापनावर मार्गदर्शन मिळाले. याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना लहान आकाराचे बियाणे आणि भाजीपाला पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले आणि लागवड पद्धतींवर कार्यशाळा घेण्यात आल्या.

नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्याने शेतकऱ्यांमध्ये शेतीबद्दल नवीन उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी त्यांचे अनुभव सांगितले की, यावर्षी मुसळधार पाऊस असूनही, नाल्याची खोली आणि रुंदी वाढल्याने शेतात पाणी शिरु शकले नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान टाळता आले. कृषी विज्ञान केंद्र नागपूर चे कृषी तज्ञ डॉ. मयूर मेश्राम, हरीश भगत आणि मारुती चवरे सारख्या तज्ञांनी शेती, माती आणि पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व यावर प्रशिक्षण दिले, त्यांची समज वाढवली आणि त्यांना पाणी पुनर्भरण आणि नाल्याच्या देखभालीचे महत्त्व कळवले. या प्रकल्पाचे समन्वयक सत्यजित जांभुळकर, व सुपरवायझर गौतम मेश्राम यांच्या देखरेखीखाली झालेल्या या कार्यक्रमात शेकडो पुरुष आणि महिलांनी उत्साहाने भाग घेतला. गावकऱ्यांनी एसबीआय फाउंडेशन आणि सद्भावना संस्थेचे यशस्वी अंमलबजावणीसाठी मनापासून आभार मानले, कारण हा उपक्रम “पाणी हेच जीवन आहे” या म्हणीला पुन्हा पुष्टी देतो असे मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.