Thursday, April 9, 2026
spot_imgspot_img
spot_img

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळा २०२६ चे भव्य-दिव्य आयोजन

नागपूर :- गजानन हायस्कूलजवळ, उदय नगर रोड, नागपूर येथे आपला माणूस फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव सोहळा २०२६ चे भव्य-दिव्य आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) तसेच संदीप जोशी (आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा व क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सुदर्शन दादा शिंदे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांची उपस्थिती लाभली.यावेळी राहुल नंदनवार व त्यांच्या टीमने “शिवगौरव गाथा” या प्रभावी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अंकिता मोरे यांनी आपल्या दमदार व प्रभावी आवाजात केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले. या सोहळ्याचे आयोजक डॉ.अ‍ॅड. गगन रहांगडाले यांनी सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच उपस्थित नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com