spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्रीहरी नगरात ज्येष्ठ नागरिक सभासद मेळाव्याचे भव्य आयोजन

नागपूर :- श्रीहरी नगर जेष्ठ नागरिक मंडळ मानेवाडा नागपूर तर्फे श्री. संकट मोचन हनुमान मंदिर, श्रीहरी नगर -2 येथे रविवारी ४ जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिक सभासद मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम भारतमातेचे पूजन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत शाल व पुष्परोपटे देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय उगेमूगे यांनी’ ज्येष्ठांचे आयुष्यात निसर्गोपचाराचे महत्त्व’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. राजीव मिश्रा सचिव, जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर यांनी’ प्रतिष्ठानचे मुख्य उद्देश व कार्य ‘ याविषयीची सखोल माहिती विषद केली. ॲडव्होकेट : स्मिता देशपांडे यांनी ‘ईच्छापत्र का करावे व कसे करावे’ याबाबतचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे व मुद्देसूद ज्येष्ठ नागरिकांना पटवून दिले. सुरेखा सागर (A P.I.) भरोसा सेल, प्रमुख व  यामिनी बोरकर, भरोसा सेल यांनी’ पोलीस विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती व संरक्षण’ यावर प्रकाश टाकला डॉ. कुन्दा पाचूंडे यांनी’ जीवनात योगाचे महत्व’ याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांनी मंडळ चालवीत असलेल्या पूर्णब्रह्म अभियानास धान्य, किराणा सामान देऊन सहकार्य केले. विजय बावनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करून वेगवेगळ्या चालीतील भावगीते, भक्तीगीते, सुमधुर गाणी ऐकवून रसिकांना वेगळ्याच भावविश्वात नेले. त्यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उत्कृष्ट, उत्तम व स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि उत्तम व्यवस्थेबाबत भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंगला गावंडे (प्रबोधन समिती, प्रमुख) यांनी केले तर आभार विठ्ठलराव घोडे यांनी मानले. समन्वय समितीचे सदस्य व पूर्णब्रह्म अभियान नागपूर अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश उरकुडे व मंडळाचे पदाधिकारी डॉ. अशोक मंदे, नामदेव  खाटके, शिवराम गुरनूले, रामदास कोल्हे, घनश्याम ढोले, प्रवीण सुरकर, अशोक माहुरे, गणेश भारद्वाज, रवींद्र नखाते, जयरामसिंह ठाकुर, केशव बोपूलकर, छोटू जगनाडे, माणिक चामाटे, मंगला उरकुडे, गीता घोडे , आशा माहुरे, ‌पुष्पा सुरकर, कैलास उरकुडे, नंदकिशोर सिंगनजुडे, मोरेश्वर ढबाले, लक्ष्मीकांत बावणे, कुसुम कोल्हे, हरीष लाकडे व सर्व ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य लाभले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.