spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महात्मा गांधी विद्यालयात वीर बालदिवस सप्ताह

खापा :- सावनेर तालुक्यातील सिरोंजी स्थानिय महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात विवीध उपक्रमाद्वारे वीर बालदिवस सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य संदिप भोंडे यांनी होते. प्राचार्य भोंडे यांनी शिख समुदायाचे दहावे गुरु गुरूगोविंद सिंग यांच्या चार मुलांनी देशाकरिता बलिदान केले. त्यांची प्रेरणा राष्ट्र निर्माण करण्याकरिता प्रेरणादायी आहे, आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या सप्ताहाची सांगता निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राध्यापक विजय काळमेघ, ज्ञानेश दळवी, योगीता बुन्हाण, शिक्षक दुर्गेश्वर चौधरी, दिनेश हजारे, बॉबी पर्वत, दिपक नारे शिक्षकेतर कर्मचारी शुभम चटकवार, भारती सोमकुवर, कुंदा बाजनघाटे यांनी तसेच रामकृष्णा टेकाडे यांच्या मार्गदर्शनात मुरलीधर तवले व पुजा दहिकर यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles