spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील फळबागांना भेटी

नागपूर :- रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील विविध प्रगतीशील शेतकऱ्यांच्या फळबाग व नर्सरींना भेट देऊन पाहणी केली. कळमेश्वर तालुक्यातील कोहळी, काटोल तालुक्यातील हातला येथील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या फळबागांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, फलोत्पादन विभागाचे संचालक अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.देवानंद पंचभाई, वंडली येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ.मेघा डहाळे, कृषी महाविद्यालयाचे विभागीय प्रमुख डॉ. विनोद राऊत तसेच मनोज जवंजाळ यांच्यासह फलोत्पादन व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सर्वप्रथम त्यांनी कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतलेल्या कोहळी येथील सुषमा सुभाषराव वानखडे यांच्या फळबागेला भेट दिली. यात त्यांनी इंडो इस्राइल पद्धतीने संत्रा फळ पिकाची लागवड, बेन्डिंग पद्धती, रोटावेटर व तन नाशकाचा कमीत कमी वापर, जैविक खताचा वापर आदी विषयांची माहिती जाणून घेतली.

त्यानंतर त्यांनी काटोल तालुक्यातील हातला येथील प्रगतीशील शेतकरी धीरज जुनघरे यांच्या शेतीला भेट दिली. एकूण 45 हेक्टर मध्ये संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. यासाठी इंडो इस्राइल पद्धतीने आधुनिक लागवड करण्यात आली आहे. यासाठी आधुनिक सिंचन प्रणाली व पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून उच्च उत्पादकता मिळविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या सर्वांची माहिती फलोत्पादन मंत्री श्री. गोगावले यांनी यावेळी घेतली. काटोल येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रालाही त्यांनी भेट दिली.

काटोल येथे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रास भेट देऊन तेथील संशोधन कार्याची पाहणी केली. विद्यापीठाने इंडो इस्राइल पद्धतीने लागवड केलेल्या मातवृक्ष बागांची, शेडनेट मध्ये उत्पादीत संत्रा मोसंबी कलमांची तसेच संग्रहित केलेल्या संत्रा मोसंबीच्या विविध वानांच्या फळाच्या प्रदर्शनीची पाहणी केली.

Popular Articles