– जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- देवलापार परिक्षेत्रात मागील काही वर्षांपासून वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीने पोलिस ठाणे देवलापार येथे भारतीय न्याय संहिता अंतर्गत एफआयआर नोंद करण्याची मागणी केली आहे. समितीच्या निवेदनानुसार, परिसरात वारंवार वाघ व इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीबाबत स्थानिक नागरिकांनी व समितीने अनेक वेळा वन विभागाला लेखी व तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र, संबंधित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतीही ठोस व प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही.
फेब्रुवारी २०२६ मधील धक्कादायक घटना
◼️०८ फेब्रुवारी-सवरा येथे सुरज धूर्वे या नागरिकाचा वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू
◼️१४ फेब्रुवारी वाघाने एक बकरा, एक २बकरी हल्ला करून मारले
◼️१४ फेब्रुवारी परिसरात वाघाचा मुक्त संचार, माहिती असूनही वन विभागाने दुर्लक्ष
◼️१८ फेब्रुवारी ६५ वर्षीय गुरूलाल वाडीवे या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला.
◼️२० फेब्रुवारी शेतात काम करत असतांना ३४ वर्षीय मुक्ता जुगडया मरसकोल्हे महिलेवर पती समक्ष हल्ला करून ठार मारले. या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
समितीने स्पष्टपणे आरोप केला आहे
१) वन विभागाने मिळालेल्या माहितीची गंभीर दखल घेतली नाही,नागरिकांना योग्य सुरक्षा व सतर्कता सूचना देण्यात अपयश, हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई नाही, यामुळे हे स्पष्ट होते की,संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच नागरिकांचे जीव गेले असून, ही गंभीर प्रशासनिक बेपर्वाई आहे.
२ ) ०६ फेब्रुवारी रोजी समितीचे पदाधिकारी यांनी देवलापार पोलिस स्टेशन गाठून एफआयआर दाखल करून कार्यवाहीची मुख्य मागणी केली. समितीच्या नुसार सदर प्रकरणात दोषी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस २०२३) अंतर्गत गुन्हा दाखल करून एफआयआर नोंद करावी व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
डार्क घेणे
देवलापार परिक्षेत्र जनहित संरक्षण समितीचा इशारा :
जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आमरण उपोषण आणि चक्का जाम यासारख्या आक्रमक भूमिका घेऊन शासनाविरोधात मोठा जनआंदोलन उभारण्यात येईल.
०६ तारीख गेली पण सभेची आठवण नाही
रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्यमंत्री अँड. आशिषजी जयस्वाल यांनी दिनांक २७ फेब्रु २०२६ रोजी देवलापार परिसरातील सुरू असलेल्या धरना आंदोलन स्थळी भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि या संदर्भात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ६ एप्रिल २०२६ रोजी सभा आयोजित करून सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले त्यांनी वन विभागाला पत्रही दिल्याचे समजते मात्र दुर्देव अशी की, वन विभाग त्यांच्याही पत्राला केराची टोपली दाखवली. यावेळी मृत मुक्ता चे पति जुगळ्या मरसकोल्हे आणि मृत सुरज धुर्वे यांची पत्नी प्रभा धुर्वे एफआयआर च्या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान समिती संरक्षक, विजय कोकोडे, समितीचे अध्यक्ष हरिश उईके, संयोजक हरिश्चंद्र सिरीयाम, कार्याध्यक्ष महेश ब्रम्हनोटे, प्रचार प्रमुख रमेश कुमरे, माजी जिल्हा परिषद सभापती दुर्गावती सरियाम,उमेश भांडारकर, मोईन पठाण, शहारू मरस्कोल्हे, रामचंद्र अडमाची, रविन्द्र कुमरे, प्रेम भलावी, चिंतामण वरकडे, धर्मराज वरकडे, कृष्णकुमार वरकडे, धर्मराज कोकोडे, रमेश कुमरे, रमेश ठाकरे, कैलास निघोट, गेंदालाल उईके, गोपीचंद कुळसाम, गुंगा मराप इत्यादी उपस्थित होते .