spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयात विनम्र अभिवादन

हंसराज प्रतिनिधी भंडारा :- बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी, 1832 रोजी महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरु केले. हाच दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा माहिती अधिकारी कायालय,जिल्हा नियोजन इमारत दुसरा माळा,भंडारा येथे मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे,व कार्यालयाचे कर्मचारी वर्ग यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय जाधव, बंडूसिंग राठोड,सुनिल फुलसुंगे,घनश्याम सपाटे, रेखा निनावे, या कार्यक्रमास उपस्थित होते.

Popular Articles