spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आमचे पालकमंत्री आहे तेव्हा नगराध्यक्ष सुद्धा आमचाच! – माजी आ. रेड्डी

– युती झाली तर सन्मानजनक व्हावी – रेड्डी

– पत्र परिषदेत माजी आमदार रेड्डी यांची माहिती

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- भाजप शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर युती होईल की स्वबळावर स्वतंत्र लढावे लागेल असे दुमत असताना ‘युती झाली तर सन्मानजनक व्हावी तसेच त्यात ७५ टक्के वाटा आम्हाला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी (ता.११) नोव्हेंबरला किराड भवन येथील कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे मांडली.

रेड्डी म्हणाले की आमचे मुख्यमंत्री आहे, आमचे पालकमंत्री आहे तेव्हा नगराध्यक्ष सुद्धा आमचाच पाहिजे, रामटेक मतदार संघातील चारही ठिकाणी म्हणजेच रामटेक पारशिवनी, कन्हान व कांद्री येथे आमचेच नगराध्यक्ष बसावे अशी आमची इच्छा आहे. पुढे ते म्हणाले की यासंबंधी सर्व चारही ठिकाणी बैठकी पार पडलेल्या आहेत, समिती सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत, जिल्हाध्यक्ष राऊत यांची कोर कमिटीची बैठक सुद्धा पार पडलेली आहे. युतीबाबत आताही चर्चा झालेली नसून ज्या ठिकाणी आम्ही निवडून आलो त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळावी अशी आमची मागणी असल्याचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे चारही नगरपरिषद मधील इच्छुकांची तयारी झालेली असली तरी मात्र आमच्या वरिष्ठांकडून जे आदेश येतील त्यानुसार आम्ही काम करू असेही रेड्डी यांनी सांगितले. पत्र परिषदेत यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे सह संजय मुलमुले, दिलीप देशमुख, आलोक मानकर, योगेश म्हात्रे, संजय बिसमोगरे, कविता मुलमुले, चित्रा धुरई, उज्वला धमगाये, उमेश पटले, रजत गजभिये, नंदु कोहळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

रामटेक मतदार संघात विविध चर्चांना उधान

रामटेक मतदारसंघात मोडणाऱ्या दोन नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि शिंदेसेना महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती आहे. यात रामटेक नगपरिषद आणि पारशिवनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिंदेसेनेचा तर कन्हान-पिंपरी नगरपरिषद आणि कांट्री-कन्हान नगरपंचायतीचा उमेदवार भाजपचा असेल, अशी माहिती आहे. यासंदर्भात प्रदेश पातळीवरचे नेते निर्णय घेतील, अशी माहिती भाजपच्या जिल्हास्तरावरील नेत्याने दिली आहे. याबाबत शिंदेसेनेकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. रामटेकमध्ये भाजपची स्वतःची ताकद आहे. गतवेळी नगराध्यक्षासह भाजपचे १३ नगरसेवक विजयी झाले होते. शिवसेनेचे केवळ दोन नगरसेवक होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.