उमरेड :- बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी बायपास चौक, उमरेड येथे नाकाबंदी केली असता वाहन के १) १२ चक्का ट्रक क्र. एम एच ३४ बी होड ११०१ आणि वाहन के २) १२ चक्का ट्रक क एम एच ४०सी टी ००७३ मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. दोन्ही चालकांना विचारपुस केली असता वाहन कं १) चा चालक विकास रवि देवाडे, वय २२ वर्ष, रा. टेकाडी, ता. पवनी, जि. भंडारा आणि मालक संजय महादेव दहिवले, रा. महालगाव, ता. पवनी, जि. भंडारा अशी माहीती प्राप्त झाली तसेच वाहन कं २) चा चालक अंनता शिवशकर सावरबांधे, वय २० वर्ष, रा. शिरसाळा, ता. पवनी, जि. भंडारा आणि मालक हरीचंद्र पुडलिक नागपुरे, रा. नांदेड, ता. लांखादुर, जि. भंडारा अशी माहीती पोलीसांनी प्राप्त झाली. नमुद चालक आरोपीतांना परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे असलेल्या परवान्यापेक्षा दिनांक १५/०१/२०२६ रोजी उमरेड पोलीसांना गुप्त वाहनांमध्ये जास्त रेती मिळुन आली.
पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद दोन्ही वाहने किमती ६०,००,०००/- रूपये आणि वाहन कं १ मधुन ९ ब्रास रेती आणि २ मधुन ६.५ ब्रास रेती अशी एकुण १५.५ ब्रास रेती किंमती ७७,५००/- रूपये असा एकुण ६०,७७,५००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोस्टे उमरेड येथे कलम ३०३ (२) भा.न्या.सं सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.