Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

कोटगल :- येथील साथ फाउंडेशन कोटगल ता. जि.गडचिरोली आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात ममता दुधबावरे सरपंच ग्रा.प. कोटगल. मोहन ठाकरे अध्यक्ष तंटामुक्त समिती कोटगल, सुमित बुरांडे अभाविप गडचिरोली, जयेश ठाकरे, साथ फाउंडेशन संस्थेचे सचिव चेतन कोलते आणि वाचनालयाचे हरीश कोलते, प्रणय मेश्राम, साहिल मेश्राम सर्व सदस्य उपस्थित होते. महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणणे गरजेचे आहे,” अत्यंत साध्या पण प्रेरणादायी वातावरणात हा उपक्रम पार पडला. यावेळी परिसरातील शिवप्रेमींनी उपस्थित राहून महाराजांना मानवंदना दिली. व शिवगर्जना आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com