spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तक्रारीची तात्काळ दखल; सीताराम मंदिर परिसरातील नाल्याची पोकलेनद्वारे युद्धपातळीवर सफाई

– नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक; नगरसेविका दिव्या गायधने यांच्या पाठपुराव्याला यश

संदीप कांबळे, कामठी :- प्रभाग क्रमांक 6 मधील सीताराम मंदिर परिसरातील नाला अनेक दिवसांपासून कचऱ्याने तुडुंब भरला होता. त्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. या गंभीर समस्येबाबत प्रभागाच्या नगरसेविका दिव्या कपिल गायधने यांनी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्याकडे तक्रार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

समस्येची गंभीरता ओळखून नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी संबंधित विभागाला तात्काळ नाल्याची सफाई करण्याचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार आज पोकलेन मशीनच्या साहाय्याने नाल्यातील गाळ आणि कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

नागरिकांच्या समस्यांवर केवळ आश्वासनांची खैरात न करता प्रत्यक्ष कृतीतून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या तत्परतेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. तसेच नगरसेविका सौ. दिव्या कपिल गायधने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यालाही यश मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नाल्याच्या साफसफाईचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्ष अजय अग्रवाल आणि नगरसेविका दिव्या कपिल गायधने यांचे आभार मानले आहेत.

Popular Articles