किशोर साहू: मौदा, ता.१८ : दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील गट ग्रामपंचायत भांडेवाडी येथे सकाळी सात वाजता संपूर्ण गावामध्ये ढोल ताशाच्या गजरात तिरंगा रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.बारावीतील गट ग्रामपंचायत भांडेवाडी अंतर्गत येणाऱ्या सावंगी येथील गुणवंत विद्यार्थिनी माही कोडवते हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोडवते आणि दहावीतील शिवाडौली येथील गुणवंत विद्यार्थी अश्वजीत गौरीशंकर रामटेके या दोघांच्या व त्यांच्या पालकांच्या शाल, श्रीफळ व डिक्शनरी देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला.तसेच एक ते चार वर्गातील उत्कृष्ट मार्क घेणाऱ्या मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंचा मंगला विष्णू देशमुख, उपसरपंच सुरेश मात्रे, माजी सरपंच दामोदर वगारे , पोलीस पाटील अरुण वाघाडे, ग्रामपंचायत सदस्यगण अंकुश वाघाडे, कृष्णा वाढवे, गौरीशंकर रामटेके, अंजिरा राऊत, ललिता मरस्कोल्हे, वंदना चौधरी, शिक्षकवृंद शितोळे, तळेकर, रेखा धुर्वे, नेहा वरठी, रायवंता कोळवते, विजय नेवारे, रामेश्वर मरस्कोल्हे,शिवराम नागफासे, चैत्राम मंडारी, मनोज वाघाडे सह समस्त गावकरी उपस्थित होते.







