नागपूर :- रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत सल्लागार, एजंट व विकासकांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारी भारतीय रिअल इस्टेट सल्लागार/एजंट वेल्फेअर युनियन आपल्या यशस्वी कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने द्वितीय वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन सोमवारला 12 जानेवारीला दुपारी 3 वाजता. प्लॉट नं.10- ए, पहिला माळा, चंदननगर, जय पेंट अँ, हकीमी हार्डवेअर जवळ, संगम रेस्टॉरंट रोड, मेडिकल चौक नागपूर करण्यात आलेले आहे. युनियनच्या स्थापनेपासून आजपर्यंत रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता निर्माण करणे, सल्लागार व एजंट यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे तसेच संघटनेच्या माध्यमातून एकजूट निर्माण करणे या उद्देशाने प्रभावी कार्य करण्यात आले आहे. अल्पावधीतच युनियनने रिअल इस्टेट क्षेत्रात आपली स्वतंत्र व भक्कम ओळख निर्माण केली आहे. या वर्धापन दिन सोहळ्यास नागपूर व परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिक, सल्लागार, एजंट, बिल्डर्स व डेव्हलपर्स मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात युनियनच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार असून भविष्यातील धोरण व कार्ययोजना यावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व रिअल इस्टेट व्यावसायिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सर्वांच्या उपस्थितीमुळे संघटनेचे मनोबल वाढेल तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील एकात्मतेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय रिअल इस्टेट सल्लागार/एजंट वेल्फेअर युनियनचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा 12 जानेवारी रोजी









