मुंबई :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुकंपा नियुक्ती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच अहवाल सादर होणार आहे. अहवालानुसार आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते.
नियमांनुसार सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नियमबाह्य कामे होऊ नये, या दृष्टीने दक्षता घेण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.
चर्चेत सदस्य किशोर दराडे यांनीही सहभाग घेतला.