कामठी, १ :- जुनी कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील दालओळी नंबर दोन येथे राहत्या घरी इस्माने बेडरूम मध्ये दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार ला सायंकाळी सहा वाजता सुमारास घडली असून संजय मल्लया डीकोडवर वय 56 वर्ष असे मूर्तकाचे नाव आहेत जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय मल्ल्यया 56 वर्ष राहणार दाळ ओळी नंबर दोन येथे शिलाई मशीन रिपेरिंग चे काम करून आपल्या कुटुंबाचा उद्धार निर्वाह करून वास्तव्यास होता घरातच दुकान असल्याने पत्नी दुकानात काम करीत असतांना संजय मलया डीकोडवार ने बेडरूम मध्ये जाऊन दोराने गळफास लावून आत्महत्या केली सायंकाळी सहा वाजता सुमारास पत्नी बेडरूम मध्ये जाऊन आवाज देत असताना तिला पती संजय दिकोडवार लटकलेला स्थिती दिसून आला असता तिने आरडा ओरड करून शेजाऱ्याला बोलविले व खाली उतरवून कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्त घोषित केले घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांनी दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून जुनी कामठी पोलीस स्टेशनला कलम 194 बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आत्महत्येचे कारण कळले नसून पुढील तपास जुनी कामठी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मीना झाडे करीत आहेत मृतकाचे मागे पत्नी, मुलगा , मुलगी असा आप्त परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे








