spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर ला राजधानी चे गतवैभव प्राप्त करण्याकरीता जय विदर्भ पार्टी विदर्भातील महानगर पालिकेच्या निवडणुका लढणार

नागपूर :- जय विदर्भ पार्टीची निर्मिती स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे या मुख्य उद्देशाने झाली आहे. विदर्भातील अत्यंत त्रस्त गरीब, मध्यमवर्गीय शेतकरी जनतेला व दररोज वेठबिगारी जीवन जगण्यासाठी बाध्य झालेल्या दिशाहीन सुशिक्षित युवाशक्तीला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी झालेली आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासा करता पार्टी कटीबद्ध आहे. एकेकाळी वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड अशी महती असलेले आपले विदर्भ राज्य होते. आज मात्र येथील खनिज संपत्तीची बेमालून लूट, जंगल संपत्तीचे शोषण, रखडलेले सिंचन प्रकल्प, नामशेष उद्योग, पांदण रस्त्यांची दुरावस्था, सिंचन अनुशेष, शेतकरी आत्महत्या, मोडकळीस आलेली शिक्षण व्यवस्था, बेजार आरोग्य सेवा, प्रदूषण, कुपोषण, बालमृत्यू, गर्भारमाता मृत्यू, उपेक्षित आदिवासी, वाढता नक्षलवाद, बेरोजगारी, नोकरीसाठी युवकांचे अखंड स्थलांतरण, वाढते वृद्धाश्रम, लोकसंख्येत घट झाल्याने कमी झालेले चार आमदार व एक खासदार, राजकीय व प्रशासकीय हुकुमशाही असे विदर्भाचे हृदयविदारक वास्तव आहे. या सर्व समस्यांचे एकमेव समाधान म्हणजे विदर्भाचे स्वतंत्र राज्य.

नागपूर शहराला राजधानीचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी व विदर्भाच्या सर्वांगीण विकासाकरता जय विदर्भ पार्टी इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने सातत्याने जनजागरण अभियान राबवीत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन जनसामान्यांची चळवळ व्हावी म्हणून विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करीत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ सर्वसामान्यांच्या मनात रुजली पाहिजे व स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती बरोबर नगर पालिका क्षेत्रातील जनतेला भविष्यात होणारे फायदे समजवून सांगण्या करिता जय विदर्भ पार्टी विदर्भातील चारही महानगर पालिकेच्या निवडणूकीत उमेदवार उतरविणार आहे. व त्यांना जिंकवून सभागृहात सर्व सामान्यांचा आवाज बुलंद करून विदर्भद्रोह्यांना विदर्भातून हद्दपार करण्याचा संकल्प केला आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर सर्वस्व झोकून कार्य करणारे प्रखर विदर्भवादी सहकारी आणि विदर्भ अस्मितेसाठी अग्रेसर समविचारी पक्ष यांच्यासोबत युती करून लढण्याचे ठरविले आहे. अमरावती व अकोला महानगर पालिकेच्या निवडणुका प्रा.डॉ.पी.आर राजपूत यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार, नागपूर महानगर पालिका निवडणूका तात्यासाहेब मत्ते यांच्या नेतृत्वात लढणार तसेच चंद्रपूर शहरातील निवडणूक शहर अध्यक्ष भूषण चिलके यांच्या नेतृत्वात लढल्या जाणार आहेत.

महानगर पालिकेच्या अधिकांश भागात जनतेला आजही पक्के रस्ते, मोफत शिक्षणाच्या सोयी, फुटलेल्या नादुरुस्त गटार लाईन, साफ पिण्याचे पाणी, पथ दिवे, रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब, सार्वजनिक रुग्णालये, कचऱ्याचे दुर्गंधीत ढीग, पिसाळलेली कुत्रे, रोडावर उभी राहणारी जाणवरे, दरदिवशी वाढीव घर टॅक्स,भ्रष्टाचार या सारख्या अनेक प्रश्नांना जनतेला सामोरे जावे लागते. जय विदर्भ पार्टी स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त शासन देऊन जनतेला त्यांचे हक्क प्रदान करणे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर रोजगार प्राप्त व्हावा या उद्देशांना डोळ्यापुढे ठेवून योग्य उमेदवार निवडून आणणार. आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार.

महानगर पालिकीच्या निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा आपला अनुभव व कोणत्या मतदार संघातून लढणार या बाबत 9422102311, 8600015229, 9421705183, 9420075938, 9373023644 व 8766454005 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.