spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जवाहरनगर पोलिसांची अवैध हातभट्टीवर धडक कारवाई; ३.७८ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

हंसराज, जवाहरनगर :- भंडारा जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने शहापूर परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. ८ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक चुटे आणि त्यांच्या पथकाने शहापूर येथील आंबेडकर वॉर्डात छापा टाकला. या मोहिमेत पोलिसांनी ३१ वर्षीय आरोपी  सुनील जगदीश सेलोकर (रा. आंबेडकर वॉर्ड, शहापूर) याला अवैध दारू गाळताना रंगेहात पकडले. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यात ७२ हजार रुपये किमतीचा ३६० किलो सडवा मोहफूल, २५ लिटर हातभट्टी दारू, २० लिटर तयार दारू, लोखंडी ड्रम, जळाऊ लाकूड आणि २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा १४४० किलो सडवा मोहफूल अशा एकूण ३ लाख ७८ हजार रुपयांच्या साहित्याचा समावेश आहे.

याप्रकरणी आरोपी सुनील सेलोकर विरुद्ध जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ४१०/२०२६ नुसार, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चुटे, पोलीस हवालदार बुरडे आणि जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने पूर्ण केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन जवाहरनगरचे अधिकारी करत असून, या कारवाईमुळे परिसरात अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.