Home Latest News सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

0
60

 

गडचिरोली, दि. १४ : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल 14 व 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 02.00 वा.जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव -2025 या कार्यक्रमास प्रशिक्षण सभागृह, कृषी चिकित्सालय, शासकीय फळ रोपवाटीका, सोनापुर, गडचिरोली येथे उपस्थिती. दुपारी 02.30 वा. नगरपरिषद, गडचिरोली येथे इंटरएक्टिव्ह पॅनलचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 03.00 वा. जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हा नियोजन समितीची सभा. सायं.06.00 वा.जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पत्रकार परिषद. सायं. 06.30 वा.शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव.

शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 09.00 वा.शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 09.05 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. व सोयीनुसार रामटेककडे प्रयाण.