– अध्यक्षपदी दीपक कदम, उपाध्यक्षपदी प्रविण गहरवार बिनविरोध; २०२६–२०३१ कार्यकाळासाठी संचालक मंडळाचीही एकमताने निवड
– सहकार क्षेत्रात एकमताचा विजय बिनविरोध निवडीने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण
पंकज परशुरामकर,नवेगाव बांध :- गोंदिया जिल्हा सहकारी मंडळ मर्या., गोंदिया (रजि. क्र. १०५) च्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी दीपक कदम यांची तर उपाध्यक्षपदी प्रविण गहरवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्यांचीही बिनविरोध निवड झाल्याने सहकार क्षेत्रात समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन संचालक मंडळामध्ये मुलचंद कटरे, रमेश टेंभरे, विकास महारवाळे, भैय्याल पृस्तोडे, भैय्यालाल चांदेवार, खुशाल काशीवार, राधाकृष्ण ठाकूर, मेधनाथ येळे, संतोष बिसेन, मुखेश शिवहरे, सुभाष आकरे, अमर वहाळे, उमाशंकर हारोडे, परेश उजवने यांची संचालक म्हणून निवड झाली. तसेच स्नेहा यादव व नेहा मिश्रा यांची संचालिका म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत जिल्हा सहकारी मंडळाच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज करण्याचा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी माजी आमदार भेरसिंह (भाऊ) नागपुरे, दुर्गाप्रसाद ठाकरे, बंटी कदम, डॉ. योगेश हरनिखेडे, शंकर पटले, बंटी मिश्रा आणि रानु यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड प्रक्रियेनंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि सभासदाभिमुख करण्यासाठी नवीन संचालक मंडळ प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




