spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सत्रापुर येथे अवैध जुगार अड्यावर कन्हान पोलीसांची धाड

पाच आरोपी अटक, मोबाइल व नगद रोख रक्कम सह ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त. 
 
कन्हान १ : –  पोलीसांच्या डीबी पथकाने सत्रापुर येथे सुरु असलेल्या अवैध जुगार अड्यावर धाड टाकुन पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
           गुरुवार (दि.३१) जुलै ला पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस प्रोव्हीशन जुगार रेड व अवैध धंध्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहि ती मिळाली कि, सत्रापुर लेबर कॅम्प येथे काही युवक खुल्या जागेवर ५२ ताश पत्यावर पैशाची बाजी लाऊन हार जीतचा जुगार खेळीत आहे. पोलीसांनी घटनास्थ ळी पोहचले असता तिथे मोकळ्या मैदानावर काही युवक घोळक्यात गोलाकार बसुन बावन ताशपत्तेचा एक्का बादशहाचा खेळावर पैसे लावुन हारजीतचा खेळ खेळताना दिसुन आल्याने पोलीसांनी स्टाफसह लपुन छपुन छापा टाकला असता तिथे जुगार खेळणा रे पाच युवकांना रंगेहाथ पकडले व एक युवक पळुन गेला. यात पोलीसांनी जुगनू महादेव लोंडे वय ४८ वर्ष , अभय अशोक खडसे वय ४० वर्ष, अजय बिजेश गायकवाड वय ३० वर्ष, विजय गोवर्धन गायकवाड वय ३६ वर्ष, सतिश राजेश शेंडे वय ३५ वर्ष सर्व रा.  सत्रापुर कन्हान यांना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन तीन मोबाइल किंमत ९०,००० रुपये आणि रोख रक्कम २०१० असा एकुण ९२,०१० रुपयांचा मुद्देमा ल जप्त केला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी पाच आरोपी आणि एक फरार बल्लु उर्फ शरद शेषलाल पात्रे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे .
      सदर कारवाई पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचा मार्गदर्शनात सपोनि राहुल चव्हान, हरिष सोनभ द्रे , अमोल नागरे, मोहित झाडे, पवन भेंडरकर, सूरज कांबले, जिवन विघे, अश्विन गजभिये सह पोलीस कर्म -यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Popular Articles