Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

करवीर सोल्युशन्सचा महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

नागपूर :- ज्ञान विज्ञान चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या करवीर सोल्युशन्सतर्फे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी याशिका राऊत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. करवीर सोलुशन्सच्या अध्यक्ष छाया वझलवार यांनी याशिका यांचा भेट वस्तू, साडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वझलवार यांनी सांगितले की, याशिका राऊत यांनी नागरिकांच्या सेवेचे कार्य हाती घेतले असून, या क्षेत्रात आता पर्यंत पुरुष मंडळी कार्यरत होती, आता महिला सुद्धा या क्षेत्रात पुढे येऊ लागल्या आहेत. त्यात याशिका यांनी आघाडी घेतली आहे. ज्ञान विज्ञान चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेला २९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने हवेत फुगे उडवून हा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विविध सुंदर, वेशभूषा परिधान करून महिला दिन साजरा करण्यात आला. यात विशेषतः महिलांनी सावित्रीबाई फुले, राधा आणि इतर वेशभूषा परिधान केली होती. यावेळी भजन सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा महाजन यांनी केले.

महिलांनी सादर केलेल्या कॅट वॉकने उपस्थितीतांची मने जिंकली. .कार्यक्रमात निर्णायक म्हणून शिवानी गोरडे, आणि खुशबू गुप्ता उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन  राधा पाथरकर यांनी केले.

कार्यक्रमात सविता मंगलगिरी, ज्योती धामोरीकर, नंदिता सोनी, चंद्रिका बैस, अंजली मुलमुळे, आशा रावण, शोभना हूड, संजीवनी चौधरी, पूजा किरणाकर, विनश्री खान, फिरदोस, पायल राऊत, जुम्मा जाधव आणि तेजश्री मस्के इतर उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com