एमपीएससी परिक्षेत यशस्वी कोमल ढवळेचा संचालक माहिती कार्यालयात सत्कार

0
33

नागपूर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये सातवी आणि ओबीसी प्रवर्गात चौथी आलेली कोमल गुणवंत ढवळे यांचे अभिनंदन माहिती व जनसंपर्क कार्यालय नागपूरचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

कोमल ढवळे हया ग्रामीण भागातून यशस्वी झाल्या आहेत. तिच्या कुटुंबातील पहिल्या पदवीधर महिला आहेत. घरची परिस्थिती बेताची असतांना परिश्रमपूर्व यश त्यांनी संपादन केले आहे. कोमल ढवळे यांनी अभ्यासात सातत्य, वाचन आणि बहूश्रुतता यावर अधिक भर दिला. नव्याने स्पर्धेत यशस्वी होणाऱ्यांनी जिद्द आणि चिकाटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.