spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बिबट्याची दहशत ; ढाब्यावर जवळ मुक्त संचार, भीतीचे वातावरण

 

सात ते आठ कोंबड्यांचे केले भक्षण
सचिन चौरसिया, रामटेक २ :- रामटेक तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत हद्दीतील रामटेक-तुमसर मार्गांवरील असलेल्या गावकरी ढाब्यावर गेल्या काही दिवसापासून बिबट्याचे मुक्तपणे संचार करत असल्याने ढाबामालकासह येणाऱ्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबद रामटेक वनविभागाला तक्रार केली असून वनविभागाने उपाययोजना सुरु केल्या आहे. बिबट्यांची वाढणारी संख्या आणि नागरी भागातील मुक्त संचार यामुळे बिबट्याची दहशत वाढतच आहे.

रामटेक अंबाळा जवळील आमगाव येथील रहिवाशी तथा सामाजीक कार्यकर्ते नितीन गेडाम यांचा रामटेक-तुमसर मार्गावर गावकरी ढाबा असून उत्तम भोजनाच्या शोधात ग्राहक येथे येतात. परंतु सदर ढाबा वनपरीसराला लागुन असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथे मात्र बिबट्याने दहशत माजवलेली आहे. बिबट्याच्या वारंवार मुक्त संचार ढाब्याजवळ वाढलेल्या असून काही दिवसा अगोदर सात ते आठ कोंबड्यांना ठार मारून भक्षण केल्या असल्याचे नितीन गेडाम यांनी सांगीतले. याबाबद वनविभागाला तक्रार केली असता वनरक्षक डोंगरे यांनी ढाबापरीसराची पहाणी करून फटाके फोडले जेणेकरून आसपास बिबट दडुन बसला असेल तर तो पळुन जाईल. तसेच त्यांनी ढाबामालक नितीन गेडाम यांनाही हा उपाय करत रहाण्याचा सल्ला दिला. तर बिबट्याची कायमस्वरुपी उपाय योजना करण्याची मागणी नितीन गेडाम यांनी केलेली आहे.

Popular Articles